अमित शाहांनी मोदींना फोन फिरवला, ग्रीन सिग्नल मिळताच शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरु केलं, दिल्लीतील
ऑपरेशन टायगर UBT शिवसेना: उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या ऑपरेशन टायगर आज सक्सेसफुल झाल्याचं दिसून आलं आहे, तर काल (मंगळवारी, ता16) रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Operation Tiger UBT Shivsena) हे देखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. या सर्व घडामोडी सध्या राज्यात चर्चेत आल्या आहेत, अशातच या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला ग्रिन सिग्नल कसा मिळाला? याची सुरूवात कशी झाली याबाबतची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.(Operation Tiger UBT Shivsena)
Operation Tiger UBT Shivsena: ऑपरेशन टायगरला कसा मिळाला ग्रिन सिग्नल ?
एनडीए घटकपक्षांची दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर होते. या बैठकीमध्ये अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा झाली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची संमती आवश्यक होती. त्याचवेळी अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून या ऑपरेशनसाठी संमती मिळवली. मोदींनी संमती दिल्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही वेळानंतर एक बैठक घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी अंतिम ग्रिन सिग्नल दिला. त्यामुळे ऑपरेशनसाठी हालचाली सुरू झाल्या. तांत्रिक गोष्टी तपासण्यात काही दिवस गेले. येणाऱ्या खासदारांची संमती आणि कागदपत्रे या दरम्यान घेण्यात आली. खरं तर ३ महिन्यापूर्वी जेव्हा ऑनलाइन बैठक झाली, तेव्हाच हे ऑपरेशन होणार होते. तेव्हाच सर्व खासदार तयार देखील होते. पण एक अडचण होती. ती अडचण दूर झाल्यानंतर आता ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Operation Tiger UBT Shivsena: आईबाबा अन् साईबाबा सगळ्यांच्या शपथा फेल, ठाकरेंचे खासदार फोडले
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंचे खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते. अधुनमधून हे खासदार एकनाथ शिंदे यांना गुप्तपणे भेटतही होते. मात्र, ठाकरे गट सोडण्याचा त्यांचा निर्णय अंतिम होत नव्हता. मात्र, गेल्या आठवडाभरात यासंदर्भातील हालचालींना वेग आला होता. हे खासदार एकनाथ शिंदेंसोबत जाणार हे लक्षात आल्यानंतर ठाकरे गटाने हालचाली सुरु केल्या होत्या. या खासदारांची मनधरणी करण्यासाठी मातोश्रीवरुन प्रयत्न सुरु होते. काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, या बैठकीला फक्त पाच खासदारच पोहोचले होते. उर्वरित खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीला हजर होते, असे सांगितले जाते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिंदे गटात जाण्याच्या चर्चांविषयी सांगितले. त्यावेळी अनेक खासदारांनी आई तुळजाभवानी, साईबाबा आणि आपल्या मुलांची शपथ घेऊन आपण कुठेच जाणार नसल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, गेल्या काही तासांमधील घडामोडी पाहता आईबाबा, साईबाबा या सगळ्यांच्या शपथा फेल ठरल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सोबत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या सर्व खासदारांना अपेक्षित गोष्टी देऊन आपल्या बाजूला वळवण्यात आणि त्यांची मनधरणी करण्यात यश मिळवल्याचे दिसत आहे.
Shivsena UBT MP: काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.
Shivsena news: ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Comments are closed.