मराठा आंदोलनाची वेळ माहिती होती, मग BMC ने व्यवस्था का केली नाही?; अमोल मिटकरींचा सरकारला घरचा

मराठा आरक्षणाच्या निषेधावरील अमोल मिटकरी: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे कमालीचे हाल झाले. आंदोलकांना भररस्त्यावर स्नान करायला लागलं, तर मराठा आंदोलकांनीच नाष्ट्याची सोय केली. हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्याने जेवणाची अडचण निर्माण झालीय. याचदरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. लवकरच मुंबईला जाऊन जरांगे पाटलांना प्रत्यक्ष भेटून पाठिंबा देणार असल्याचं मिटकरी म्हणालेत. पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाचे मुख्य प्रवक्ते मांडतील मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही कायम मराठा समाजाला न्याय देण्याची असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.  आंदोलनस्थळी मराठा आंदोलकांच्या होत असलेल्या असुविधांबद्दलही अमोल मिटकरींनी खंत व्यक्त केलीय. जर आंदोलनाची वेळ तीन महिने आधीच माहीत होती.‌ तर सरकारने आंदोलकांच्या पाणी आणि इतर प्राथमिक गरजांची व्यवस्था करायला हवी होती, असं म्हणत अमोल मिटकरींनी सरकारला घरचा आहेर दिला. तसेच आंदोलकांना मुंबईत येण्याची वेळही यायला नको होती, असंही अमोल मिटकरींनी सांगितले.

अमोल मिटकरींची लक्ष्मण हाकेंवर टीका-

दरम्यान, अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंवर टीका केली आहे. लक्ष्मण हाके यांची परिस्थिती ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली असल्याचा टोला अमोल मिटकरींनी लगावला. लक्ष्मण हाकेंना ओबीसींच्या बैठकीतून हाकलून दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला आहे.

अमित शाह यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा-

सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 1 तास बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांवर देखील अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण द्या, ही मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची सह्याद्री निवासस्थानी चर्चा झाली. प्रामुख्याने ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण द्यायचं असल्यास तर कशा पद्धतीने मध्यथी करत हा प्रश्न सोडवावा, याबाबत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Raj Thackeray On Manoj Jarange Patil: मागच्या वेळी प्रश्न सुटला, मग परत मराठा आंदोलन का? हे एकनाथ शिंदेंना विचारा, राज ठाकरेंनी कात्रीत पकडलं!

Shreehari Aney On Maratha Reservation: मराठ्यांना आरक्षण मिळणं शक्य आहे का?; ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे यांनी A टू Z सांगितलं!

आणखी वाचा

Comments are closed.