महाराष्ट्रात लवकरच अजितपर्व… द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? राष्ट्रवादीच्


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर अमोल मिटकरी: देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसू शकतो, हे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य सहजपणे केलेले नव्हते. हे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्रात काहीतरी वेगळे होऊ शकते का, हे पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले पाहिजे. त्याच अनुषंगाने मी महाराष्ट्रात लवकरच अजितपर्व येईल, असे वक्तव्य केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उर्जावान मंत्री म्हणून काम करत आहेत. लाडकी बहीण योजना ही संकल्पना दादांची होती आणि त्याची अंमलबजावणीही त्यांनीच केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहि‍णींचा भक्कम आधार मिळाला, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. (Maharashtra CM)

अजित पवार हे काम करणारं नेतृत्व आहे. त्यांचे कधी रुसवेफुगवे नसतात किंवा ते सरकारवर कधी नाराजही होत नाही. इतक्या मोठ्याप्रमाणावर विरोधक त्यांच्यावर आरोप करतात, अशावेळी जवळचे बाहेरचे शांत बसून सगळं ऐकतात ,तरीही अजिबात विचलित न होता अजित पवार काम करतात. ते जनतेमध्ये सातत्याने काम करत राहतात, जनतेची सेवा करतात आणि महायुती घट्ट करतात. तुम्ही अजितदादांकडे बारकाईने पाहा, त्यांनी कधी उद्वेग व्यक्त केला नाही किंवा रुसून ते कधी बारामतीला गेले नाहीत. कुठेही आक्रमक झाले नाहीत. अजितदादा या काळात शांततेने आपले काम करत राहिले. दादांच काम जनतेला अपील होतंय. दादांनी कसलाही अट्टाहास केला नाही. आमच्या पक्षातून काही लोक तिकडे गेले, तरी दादांनी प्रतिक्रिया दिली नाही. ते म्हणतात की, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. दादांनी महायुतीमध्ये रुसण्याचा फुगण्याचा कार्यक्रम केला नाही. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्त्व स्वीकारले आहे. आम्ही राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहोत, हेदेखील मान्य करतो. पहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे कार्तिकी एकादशीला आम्ही विठ्ठलाच्या पूजेचा मान त्यांना दिला. पार्थ पवार प्रकरणात दादांचा फोन नॉट रिचेबल झाला नाही. त्यांनी संयम ठेवला, बारामतीला गेले नाहीत. गेल्या वर्षभराच्या काळात आम्ही महायुतीत घट्टपणे काम केले. देवेंद्र फडणवीस यांच्या चौखूर धावणाऱ्या रथाला पाठिंबा दिला, असेही अमोल मिटकरी यांनी सांगितले.

Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

एपस्टाईन फाईल्सवरुन अमेरिकेत गेल्या 6 महिन्यांपासून मोठा गदारोळ आहे, ती फाईल उघड झाल्यावर भारताच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. जेफ्री अ‍ॅमस्टिन हा अमेरिकेतील मोठा उद्योगपती आहे. त्याने कायदा मोडला. त्याने खूप बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गुंतवायचं आणि भानगडी करायला लावायच्या असा तो विषय आहे. सर्व मोठ्या राजकीय नेत्यांची नावे अमेरिकेत आली आहेत. त्यात राष्ट्रपती ट्रम्प यांचं देखील नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल. तिकडे निवडणूक आयोगाचे फार कडक निकष आहेत. ट्रम्प यांनी राजीनामा देणं हा त्यांचा विषय आहे.अमेरिकेची संसद त्यांच्या मागे लागली आहे. नावं खुलं करण्यास सांगत आहे. पण ट्रम्प करत नाहीत. संसद ट्रम्प यांच्या पाठिमागे सहा महिन्यापासून असून 10 हजार कागदपत्रं संसदेने ताब्यात घेतले आहेत. संसद ही कागदपत्रं उघड करू शकते. सुब्रमण्यम स्वामी यांनी हा व्हिडीओ केला आहे, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसेच, आज त्यावर संसदेत गदारोळ होऊ शकतो. त्यामुळे, मी फक्त म्हटलं मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, त्यातून काय अर्थ काढायचा तो काढा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

आणखी वाचा

भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात; मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य

आणखी वाचा

Comments are closed.