अशी ही बोगसगिरी… बड्या कंपनीच्या एक्स्पायर सीमेंटचं रिपॅकिंग; दोघांना अटक, 1446 पोती जप्त

अमरावती : भेसळ किंवा बनावट वस्तूंची विक्री करुन जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. अनेकदा लहान-सहान व्यापाऱ्यांकडून ही फसवेगिरी केली जाते. तसेच, गेल्या काही महिन्यात बोगस खते व बी बियाणांची विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. मात्र, आता चक्क बड्या कंपनीच्या सिमेंटची रिपॅकिंग करुन बोगसगिरी केली जात असल्याचे समोर आलं आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तीन ठिकाणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकत रिपॅकींग केले जाणारे सिमेंट ताब्यात घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, दोघांना अटकही करण्यात आलीय.

अमरावतीमध्ये एका नामांकित कंपनीच्या मुदतबाह्य ‘एक्सपायर’ झालेल्या सिमेंटची त्याच कंपनीच्या बॅगमध्ये रिफिलिंग करुन त्याची राजरोसपणे विक्री करण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हानून पडला. अमरावतीच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिस पथकाने रोजरोसपणे होत असलेल्या विक्रीच्या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला आहे. अमरावतीच्या मासोद, काटआमला आणि नवसारी येथील गोडाऊनमधून  निकृष्ट सिमेंटची 1446 पोती जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील सर्वाधिक 900 ते 950 पोती मासोद येथील गोडाऊनमध्ये आढळून आली आहेत. या गोदामात नामांकित अंबुजा आणि अल्ट्राटेक कंपनीचे निकृष्ट दर्जाचे सिमेंट रिपॅकींग करत नव्याने विक्रीसाठी तयार केला जात होते, पोलिसांनी गोडाऊमधील मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पंढरपुरात बोगस रासायनिक खतं जप्त

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात बोगस रासायनिक खत तयार करून शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने पोलिसांसह कारवाई करत विठ्ठल खत कारखान्यावर छापा टाकून तब्बल 11 लाख 12 हजार रुपयांचे बनावट खत जप्त केले. यावेळी 700 पोत्यांमध्ये हे खत साठवण्यात आलेले आढळून आले.

हेही वाचा

… तर तुमची अटक होईल, राज ठाकरेंचं भाषणातून सरकारला चॅलेंज; गृहमंत्री फडणवीसाचं थेट प्रत्युत्तर

आणखी वाचा

Comments are closed.