‘ऑपरेशन टायगर’वर प्रश्न, अमृता फडणवीसांनी अवघ्या एका वाक्यात विषय उरकला; म्हणाल्या…
ऑपरेशन टायगरवर अमृता फडणवीस: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदार फुटीच्या चर्चांनी चांगलंच वादळ निर्माण केलं आहे. ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार फुटल्याची आणि त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी पत्र दिल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. या राजकीय भूकंपावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ऑपरेशन टायगरवर प्रश्न विचारताच अमृता फडणवीस यांनी केवळ एका वाक्यात हा विषय संपवला आहे.
जागतिक योग दिनाच्या (International Yoga Day) निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना ‘ऑपरेशन टायगर’बाबत प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस म्हणाल्या की, “आज योग दिवस आहे. ऑपरेशन टायगर हा त्या दोन पक्षांमधला विषय आहे, आपण चांगल्या दिवशी फक्त योग या विषयावर बोललं पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.
Amruta Fadnavis: शेतकऱ्यांच्या मुलांसोबत साजरा केला योग दिन
राजकीय विषयावर बोलणे टाळत अमृता फडणवीस यांनी योग दिनाच्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, “योग दिवसाच्या निमित्ताने आम्ही योग दिवस शेतकऱ्यांच्या मुलांसह आणि मुंबई महापालिकेतील शाळेतल्या मुलांसह सेलिब्रेट करतो आहोत. शेतकऱ्यांची जी मुलं मुंबईत आली आहेत त्यांना आम्ही मुंबईची सैरही घडवणार आहोत. आज रात्री जेवण झाल्यानंतर ते सगळे आपल्या आपल्या घरी जातील. रोज योग करा आणि निरोगी राहा असंच मी सांगेन.”
या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री अनुप्रिया पटेल आणि राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मुलांसोबत योग करण्याचा विशेष आनंद मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
Nagesh Patil Ashtikar: नागेश पाटील आष्टीकरांनी सांगितलं ठाकरे गटाला सोडण्याचे कारण
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांपैकी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात गेल्याचं स्पष्ट केलं आहे. नागेश पाटील आष्टीकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली असून मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, असे आष्टीकर यांनी सांगितले आहे. आम्ही 18 जूनपर्यंत कुठेही गेलो नव्हतो, मात्र शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात आमच्यावर बोचऱ्या शब्दात टीका करण्यात आली, त्याने आमची मनं दुखावली. पण, खरं सांगायचं तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेशिवाय कुठलेही कामे होत नाहीत. मी जे काही पाऊल उचललं, ते लोकांनी मला ज्या आशेनं खासदार म्हणून निवडून दिलंय, ती त्यांची कामे पूर्ण करायची म्हणून. सत्तेत असल्याशिवाय लोकांची ही कामे होत नव्हती. अनेकांना माझी भूमिका पटली नसेल, काहींना पटलीही असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Comments are closed.