अंगकृष रघुवंशीच्या वादग्रस्त विकेटवरून राडा; बॅट-हेल्मेट दिले फेकून, तिसऱ्या पंचांच्या निर्णयान

आंगकृष्ण रघुवंशी विकेट वाद LSG विरुद्ध KKR IPL 2026 : भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएल 2026 चा 38 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जात आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा अंदाज घेत घेतलेला हा निर्णय सुरुवातीलाच योग्य ठरल्याचे पाहायला मिळाले.

केकेआरची खराब सुरुवात

कोलकाता नाईट रायडर्सची फलंदाजीची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामीवीर टिम सीफर्ट याला लखनऊच्या मोहसिन खानने खातेही उघडू दिले नाही. मोहसिनने टाकलेल्या अचूक चेंडूवर सीफर्ट स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात असलेला कर्णधार अजिंक्य रहाणे देखील फार काळ टिकू शकला नाही. रहाणेने 15 चेंडूत केवळ 10 धावा केल्या आणि तोही तंबूत परतला. यामुळे केकेआरचा संघ दबावाखाली आला.

अंगकृष रघुवंशीच्या विकेटचा मोठा वाद

या सामन्यात खरी खळबळ उडाली ती म्हणजे अंगकृष रघुवंशीच्या विकेटमुळे. कोलकाताचा हा युवा फलंदाज मैदानात स्थिरावत असतानाच एका विचित्र पद्धतीने बाद झाला. प्रिंस यादवच्या एका चेंडूवर रघुवंशीने मिड-ऑनच्या दिशेने फटका मारला आणि धाव घेण्यासाठी धावला. मात्र, दुसऱ्या टोकाला असलेल्या कॅमेरून ग्रीनने त्याला माघारी धाडले.

माघारी परतताना रघुवंशीने चेंडूच्या दिशेने पाहत आपली दिशा बदलली आणि डाईव्ह मारली. दरम्यान, शमीने मारलेला थ्रो थेट रघुवंशीला लागला. लखनऊच्या खेळाडूंनी तात्काळ ‘फील्डिंगमध्ये अडथळा’ (Obstructing the Field) आणल्याची अपील केली. मैदानी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे (Third Umpire) सोपवला. रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी असा निष्कर्ष काढला की, रघुवंशीने जाणूनबुजून आपली धावण्याची दिशा बदलली होती जेणेकरून थ्रो स्टंपला लागू नये. पंचांनी त्याला बाद घोषित करताच केकेआरच्या गोटात संतापाची लाट पसरली.

रघुवंशी संतापला

पंचांच्या निर्णयावर रघुवंशी अत्यंत नाराज दिसला. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने रागाच्या भरात आपली बॅट जमिनीवर आपटली आणि हेल्मेट फेकून दिले. त्यावेळी केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर मैदानाच्या कडेला पंचांशी या निर्णयाबाबत चर्चा करताना दिसले.

हे ही वाचा –

CSK vs GT IPL 2026 : घरच्या मैदानावर चेन्नईचा लाजिरवाणा पराभव; गुजरातच्या एका विजयाने IPLचं संपूर्ण गणितच बिघडवलं

आणखी वाचा

Comments are closed.