भरत गोगावलेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर अंनिसची तीव्र नाराजी; म्हणाले, अंधश्रद्धेला…

राजकारण्यांवरील अनीस: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. त्याआधी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनीही भरत गोगावले यांचा असाच एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून राज्यातील राजकीय नेत्यांच्या वाढत चाललेल्या अंधश्रद्धेच्या अघोरी पूजापद्धतीवर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राजकीय मराठी समाजाचा आरसा असतात व पुढाऱ्यांकडून समाजासाठी विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगणे अपेक्षित असते. मात्र भरत गोगावले यांचे उदाहरण असो किंवा देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा निवासस्थानी गृह्प्रवेशांचा विषय असो किंवा सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे सर्व मंत्री व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला घेऊन जात नवस फेडण्याचा विषय असो, हे सर्व उदाहरणे अंधश्रद्धेला खत पाणी देणारे आहे. आपल्या संविधानात तरतूद असलेल्या विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या पुरस्काराच्या कलमाच्या विरोधातले असल्याचे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींवर गुन्हे दाखल करावे

आपल्या राज्यात असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे नाव ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 या कायद्याची अंबलबजावणी करून घेणाऱ्यांची कृती हास्यापद असून अशा घटनांची चौकशी व्हायला हवी. या संदर्भात कोणी पुराव्यासह तक्रार दाखल करत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनी केली आहे.

व्हायरल व्हिडीओवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

दरम्यान, याबाबत भरत गोगावले यांनी म्हटले आहे की, ‘अघोरी विद्येला आम्ही मानत नाही. जे नशिबात होतं तेच होतं. त्यामुळे आम्ही अघोरी विद्या करून मोठे झालो असतो तरी याआधी अशा विद्या करून कधीच पालकमंत्री झालो असतो. माझ्या घरी आलेले साधू महाराज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सर्वांचा आशीर्वाद घेत असतो. आम्हाला खरोखर अघोरी विद्या करायची असती तर असे व्हिडिओ काढून टाकले नसते. आम्ही हिंदुत्व आणि देवधर्म करणारे आहोत. ज्यांना माझे हे प्रकार अघोरी वाटतात त्यांना वाटू द्या. आम्ही असले प्रकार करत नाही. पालकमंत्रीपदासाठी वेठीस धरण्यासाठी राष्ट्रवादीचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Bharat Gogawale : भरत गोगावलेंकडून रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अघोरी मंत्रतंत्राचा वापर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, ‘काल मला…’

आणखी वाचा

Comments are closed.