वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!

मुंबई : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात केला जात आहे. तर वाल्मिक कराडवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी वाल्मिक कराडवरून महायुतीसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

अंजली दमानिया यांनी ‘एक्स’ पोस्ट करत म्हटले आहे की, वाल्मिक कारडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, 23 सेक्शन्स त्यापैकी अनेक सेक्शन 3 ते 4 वेळा देखील आहेत. एकूण 45 सेक्शन्स लागले आहेत. इतके गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? त्यांना आधी मविआने थारा दिला आता महायुतीने दिला आहे. बीडमधून खूप फोन आले. या सगळ्यांची खूप दहशत आहे. लोकांनी जागायचं कसं? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

धनंजय मुंडेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केल्यानंतरगेल् या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर धनंजय मुंडेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून मागणी हकालपट्टी करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीय.

इतर महत्त्वाच्या बातम्या

एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही…; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले

Sharad Pawar: शरद पवारांनी मस्साजोगमध्ये पाऊल ठेवताच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, गावकरी म्हणाले….

अधिक पाहा..

Comments are closed.