हे ‘देशभक्ती’ नाही, तर ‘फोटोभक्ती’ आहे! सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा फडणवीसांवर निशाणा

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडी आणि आखातातील युद्ध या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी सरकारी लवाजमा सोडून थेट बुलेटवर विधान भवनामध्ये पोहोचले. मात्र या बुलेटच्या पीयुसीची मुदत संपल्याचा दावा काँग्रेसने केला होता. आता मुख्यमंत्र्यांच्या बुलेट सवारीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हे ‘देशभक्ती’ नाही, तर ‘फोटोभक्ती’ आहे, अशी टीका त्यांनी एक्सवर पोस्ट करून केली.

मुख्यमंत्र्यांना ‘साधेपणाचा’ स्टंट करताना कायद्याचा विसर; ज्या बुलेटवरून विधानभवन गाठलं त्याचं PUC एक्सपायर झाल्याचा काँग्रेसचा दावा

मुख्यमंत्र्यांचा आजचा केवळ एक फोटो ड्रामा होता. फडणवीसजी, तुम्ही एक दिवस बुलेटवर आलात, बाकी दिवस काय? महापौर ताई एक दिवस स्कूटरवर, तर मंत्री नितेश राणे एक दिवस पायी, मग बाकी 364 दिवस काय? असा सवाल करत अंजली दमानिया यांनी सगळे फक्त ड्रामा करत असल्याचा आरोप केला. तसेच हे ‘देशभक्ती’ नाही, हे ‘फोटोभक्ती’ आहे, अशी टीकाही त्यांनी केली. एवढेचट नाही तर कायमचा काफिला बंद करा, तेव्हाच खरी वाहवा मिळेल. ती खरी देशभक्ती होईल, असे आवाहनही त्यांनी केले.

Comments are closed.