नीट घोटाळ्याचे ‘पुणे कनेक्शन’; 21 बँक खात्यांतून पैशांचा महापूर; सीबीआय तपासात धक्कादायक माहिती

पुणे : नीट पेपर फुटी प्रकरणातील पुण्यातून ताब्यात घेतलेल्या महिलेची धक्कादायक माहिती समोर समोर आली आहे. नीट परीक्षेच्या प्रक्रियेच्या दरम्यान मनीषा वाघमारे यांच्याकडे तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यांतून लाखो (NEET Paper Leak) रुपये जमा, तपासातून माहिती समोर आली आहे. ही रक्कम पेपर (NEET Paper Leak) विक्रीसाठी किंवा त्यासंबंधित व्यवहारांसाठी आगाऊ म्हणून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या 21 खात्यांचा मालक कोण आहे आणि हा पैसा नेमका कुठून आला, याचा तपास सीबीआय करत आहे. लोखंडे आणि मनीषा यांच्यात अनेक संशयास्पद व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेस झाल्याची माहिती समोर आली आहे. मनीषा ही विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.(NEET Paper Leak)

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मनीषा वाघमारे यांच्या घरी सकाळी दहा वाजल्यापासून CBI अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगरमधून ताब्यात घेतलेल्या धनंजय लोखंडे याच्यासोबत मनीषा वाघमारे यांचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषण तपास यंत्रणेला आढळून आले आहे. तपासादरम्यान वेगवेगळ्या 21 बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्सफर झाल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे अधिकाऱ्यांचा संशय अधिक बळावला आहे. संबंधित खात्यांमध्ये NEET परीक्षेच्या काही दिवस आधीच पैसे जमा झाल्याने या व्यवहारांमध्ये अ‍ॅडव्हान्स रक्कम घेतल्याची शक्यता तपासली जात आहे. दरम्यान, अ‍ॅडमिशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांची ओळख झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.(NEET Paper Leak)

NEET पेपर लीक: पुणे आणि नाशिक कनेक्शन

यापूर्वी याच प्रकरणात पुण्यातील फुरसुंगी येथून सायबर सुरक्षा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी शेषराव सोळंकी आणि बिबवेवाडीतील ब्युटी पार्लर चालक मनिषा वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नाशिकमधून शुभम खैरनार यालाही अटक करण्यात आली आहे. धनंजय लोखंडे हा स्वतः पुण्याच्या वाघोली परिसरात राहून एजंट्समार्फत प्रश्नपत्रिका विकण्याचे रॅकेट चालवत होता. या रॅकेटमध्ये आता ओंकार शिंगोटेचे नाव समोर आल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाच या घोटाळ्यात मोठा सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे.

NEET Paper Leak: सीबीआय चौकशीत मोठे खुलासे होण्याची शक्यता

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) घेण्यात आलेल्या या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांमध्ये या घोटाळ्याचे धागेदोरे पसरले आहेत. कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिकांची देवाणघेवाण करून लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. ओंकार शिंगोटेच्या चौकशीतून या रॅकेटमधील इतर आर्थिक व्यवहार आणि नवीन एजंट्सची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Who is Dhananjay Lokhande: कोण आहे धनंजय लोखंडे?

राहुरी तालुक्यातील माहेगाव-महाडूक सेंटर येथील मूळ रहिवासी असलेला 26 वर्षीय धनंजय निवृत्ती लोखंडे हा सध्या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. त्याचे वडील एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून कार्यरत असून कुटुंबात दोन भाऊ आहेत. त्याचा मोठा भाऊ डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय लोखंडेने कर्नाटक राज्यातील मंगळूरू विद्यापीठातून BAMS चे शिक्षण पूर्ण केले असून, दोन वर्षांपूर्वी त्याने पदवी संपादन केली होती. प्राथमिक माहितीनुसार, तो पुण्यात मेडिकल अॅडमिशनसंदर्भात कन्सल्टिंगचे काम करत होता. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तो पुण्यातील वाघोली परिसरात वास्तव्यास होता आणि तेथेच प्रॅक्टिस करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, तो गावाकडे क्वचितच येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

NEET Paper Leak: नाशिकच्या शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड

NEET प्रकरणातील नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच शुभमचा भाऊ भावेश खैरनार याच्याकडून नांदगाव पोलिसांनी गावठी पिस्टल जप्त केले होते. या प्रकरणी पोलिसांनी भावेश खैरनारला अटक केली होती. तपासादरम्यान, परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने भावेशने हे पिस्टल खरेदी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. याप्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत भावेश खैरनार आणि त्याच्या साथीदाराविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या भावेश खैरनार हा जामिनावर मुक्त असल्याची माहिती आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.