लेकाच्या साखरपुड्यानंतर अंजली तेंडुलकरांनी विरारमध्ये नवं घर खरेदी का केलं? समोर आली मोठी अपडेट

अंजली तेंडुलकर विरारमध्ये अपार्टमेंट खरेदी करतात: काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Master Blaster Sachin Tendulkar) लेक अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) गपचूप साखरपुडा झाला. अगदी छोटेखानी समारंभात सचिनच्या लेकानं आणि प्रसिद्ध उद्योगपतीच्या नातीनं एकमेकांना अंगठ्या घातल्या. सचिनच्या लेकानं उद्योगपती रवी घई यांच्या नातीशी म्हणजेच, सानिया चंडोकची (Saniya Chandok) आपली आयुष्यभराची जोडीदार म्हणून निवड केली आहे.  आधी फक्त साखरपुड्याच्या बातम्या समोर आलेल्या, आता स्वतः सचिन तेंडुलकरनं याची पुष्टी केली आहे. साखरपुडा झाला असला तरीसुद्धा आता आणखी एक माहिती समोर आल्यामुळे तेंडुलकर कुटुंबीयांची चर्चा रंगली आहे. सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी विरारमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी विरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत 391 चौरस फूटांचं अपार्टमेंट खरेदी केलं आहे. अर्जुनचा साखरपुडा झाल्याच्या काही दिवसांतच अंजली तेंडुलकरांनी हे अपार्टमेंट खरेदी केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

अंजली तेंडुलकर यांनी विरारमध्ये का खरेदी केलं नवं घर?

Zapkey.com नं दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी विरारमध्ये 32 लाखांचं अपार्टमेंट खरेदी केलं आहे.

विरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत हे अपार्टमेंट खरेदी केलं आहे. कागदपत्रांनुसार, हा व्यवहार 30 मे 2025 रोजी नोंदणीकृत झाला होता आणि त्यात 1.92 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क समाविष्ट होतं. 391 चौरस फूट आकाराचं हे अपार्टमेंट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे.

महिला घर खरेदीदार म्हणून, अंजली तेंडुलकर यांनी मुद्रांक शुल्कावर 1 टक्का सवलतीचा लाभ घेतला. महाराष्ट्रात, महिला घरमालकांना या लाभाचा लाभ मिळतो, राज्यात शहर आणि जिल्ह्यानुसार मुद्रांक शुल्क दर 5 टक्के ते 7 टक्के दरम्यान आहे.

अंजली तेंडुलकर यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये राहणार कोण?

अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्यानंतर काहीच दिवसांत अंजली तेंडुलकर यांनी अपार्टमेंट खरेदी केल्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलेलं. अंजली यांनी अर्जुन आणि त्याची होणारी पत्नी सानिकासाठी फ्लॅट खरेदी केल्याच्या चर्चाही सुरू होत्या. पण, आता या फ्लॅटमध्ये कोण राहणार? हे समोर आलं आहे. अंजली तेंडुलकर यांनी हा फ्लॅट त्यांच्या एका कर्मचाऱ्यासाठी खरेदी केला आहे.

सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर डॉक्टर आहे. त्या नामांकीत बालरोगतज्ज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना  बालरोगशास्त्रामध्ये सुवर्णपदकही मिळालं होतं. सध्या त्या स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यासाठी अंजली तेंडुलकर यांनी विरारमधलं अपार्टमेंट खरेदी केलं आहे. विवारमधील नावाजलेल्या ठिकाणी हे अपार्टमेंट असून अंजली तेंडुलकरांच्या नावावर आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अनिल कपूर यांच्या लेकानं मुंबईत खरेदी केलं 5 कोटींचं आलिशान अपार्टमेंट; आतापर्यंत फक्त तीनच फिल्म्समध्ये केलंय काम

आणखी वाचा

Comments are closed.