सॉफ्टबॉल क्रिकेट लीगच्या दुसरा हंगामाची घोषणा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी सॉफ्टबॉल क्रिकेट लीगच्या दुसऱ्या हंगामाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या लीगमध्ये संपूर्ण देशभरातील 32 संघ सहभागी होणार असून त्यांच्यामध्ये 127 सामने खेळवण्यात येणार आहेत. ही स्पर्धा 25 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर  या कालावधीत होणार असून स्पर्धेचे सर्व सामने बंगळुरू येथे खेळवले जाणार आहेत. बंगळुरू येथे एका पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगची नवीन हंगामासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी हरभजनचा सहकारी सुरेश रैना त्याच्या जोडीला असणार आहे.

Comments are closed.