ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; मल्लिक यांनी पक्ष सोडला.

कोलकाता:

पश्चिम बंगालचे माजी मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांनी शुक्रवारी आरोग्याच्या कारणास्तव तृणमूल काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. पक्षनेतृत्वाला स्वत:च्या निर्णयाविषयी यापूर्वीच कळविले होते, असे मल्लिक यांनी सांगितले आहे. तृणमूल काँग्रेसकडून संघटनेत मोठे फेरबदल आणि मल्लिक यांना नव्या कार्यकारिणी समितीत सामील करण्यात आल्यावर त्यांनी राजीनामा दिला आहे. मल्लिक यांना ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. ममता बॅनर्जी सरकारमध्ये एक दशकांपर्यंत त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. मल्लिक हे 2011-21 दरम्यान राज्याचे अन्न पुरवठा मंत्री राहिले आहेत.

ऑक्टोबर 2023 मध्ये रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आल्यावर मल्लिक यांच्या राजकीय कारकीर्दीला झटका बसला होता. अटकेत असताना मल्लिक यांनी वारंवार आरोग्यविषयक समस्यांचे कारण देत वैद्यकीय तपासणी करविली होती. तर आता त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने चर्चेला वेग आला आहे.

Comments are closed.