आशियाई जिम्नॅस्टिक्ससाठी अनुष्का, इशिताची हिंदुस्थानी संघात निवड
येत्या जून महिन्यात चीनच्या झुनई शहरात होत असलेल्या आशियाई पुरुष आणि महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी ज्युनियर आणि सीनियर खेळाडूंची निवड हिंदुस्थानी जिम्नॅस्टिक्स महासंघाने जाहीर केली. महिलांच्या सीनियर गटात महाराष्ट्राच्या अनुष्का पाटील आणि इशिता शेवाळे यांची निवड करण्यात आली असून मुलांच्या ज्युनियर संघात निशाद नरवणेची निवड करण्यात आली आहे. येत्या 18 ते 28 जूनदरम्यान या स्पर्धा रंगणार आहेत.
आशियाई जिम्नॅस्टिक्ससाठी निवडण्यात आलेले संघ
महिला जिम्नॅस्ट – वरिष्ठ खेळाडू – अनुष्का पाटील (महाराष्ट्र), इशिता रेवाळे (महाराष्ट्र), प्रणती नायक (रेल्वे), प्रोतिषा सामंता (रेल्वे), बिदिशा गयेन (रेल्वे), प्रशिक्षक – अशोक मिश्रा (उत्तर प्रदेश), पायल भट्टाचार्जी (रेल्वे).
ज्युनियर खेळाडू – पारोमिता बेरा (बंगाल), श्रेया घोष (बंगाल), अनुषा हवालदार (बंगाल), श्रेयांशी रॉय (त्रिपुरा), अनन्या गुप्ता (उत्तर प्रदेश), प्रशिक्षक – राखी देबनाथ (रेल्वे), दीपा कर्माकर (त्रिपुरा), पंच – प्रणाली मांडवकर (महाराष्ट्र), अन्नप्रदेश (महाराष्ट्र)
पुरुष जिम्नॅस्ट – वरिष्ठ खेळाडू – तपन मोहंती (ओडिशा), योगेश्वर सिंग (हरियाणा), स्वातीश केपी (रेल्वे), तपेश्वरनाथ दास (ओडिशा), सत्यजित मोंडल (रेल्वे), प्रशिक्षक राकेश कुमार पात्रा (जीएफआय), प्रवीण शर्मा (रेल्वे), पंच – दीपक काबरा (एमएजी), भगवान व्यासकर (एमएजी).
ज्युनियर खेळाडू – हरचीत दामोदरन (उत्तर प्रदेश), निशाद नरवणे (महाराष्ट्र), एसके नबीघ अली (बंगाल), अक्षत बजाज (दिल्ली), मोहम्मद झैद अन्सारी (उत्तर प्रदेश), प्रशिक्षक – राजाबाबू यादव (उत्तर प्रदेश), यिन अलवारेझ (उत्तर प्रदेश).
Comments are closed.