तीन लाखांच्या आयफोनच्या स्क्रीनला तडा; ऍपल कंपनी म्हणतेय, समस्या असेल तर फोन बदलून देऊ
ऍपल कंपनीने मागील महिन्यात लाँच केलेला पहिला फोल्डेबल फोन डय़ुओच्या स्क्रीनमध्ये समस्या येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. ग्राहकांच्या तक्रारीनुसार, फोनच्या आतील स्क्रीन तुटणे किंवा त्यावर क्रॅक दिसत असल्याचे ग्राहकांनी म्हटले आहे.
ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतर ऍपल कंपनीनेसुद्धा हे मान्य केले असून कंपनीने म्हटले की, आयफोन डय़ुओच्या काही युनिट्सच्या आतील डिस्प्लेमध्ये काही समस्या येत आहे, हे खरे आहे. ही खराबी काही मोजक्या फोनमध्ये आढळली आहे. ज्यांच्या फोनमध्ये ही खराबी असेल अशा ग्राहकांना नवा आयफोन डय़ुओ देऊ, असे म्हटले आहे. काही ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनुसार, फोन मधोमध उघडल्यानंतर आणि वापरल्यानंतर काही वेळात स्क्रीन खराब झाल्याचे दिसले. ज्या ग्राहकांच्या फोनच्या स्क्रीनमध्ये काही समस्या येत असेल तर त्यांनी रिप्लेसमेंटसाठी ऍपल केअरशी संपर्क साधावा.
सर्वात महागडा आयफोन
ऍपल कंपनीने 9 सप्टेंबर रोजी आयफोन डय़ुओला लाँच केले आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 3 लाख रुपये तर टॉप मॉडलची किंमत 4.50 लाख रुपये आहे. या फोनमध्ये 5.4 इंचाचा कव्हर डिस्प्ले आणि त्यात 7.6 इंचाचा मेन स्क्रीन दिले आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही आयफोनमधील सर्वात मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.
Comments are closed.