'आर्टिकल 370' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कार्तिक आर्यन-मामूटीचा होणार गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. 2024 मध्ये प्रदर्शित चित्रपट अन् दमदार अभिनयासाठी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. ‘आर्टिकल 370’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. याच चित्रपटातील अभिनयासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कार्तिक आर्यनला देण्यात येणार आहे. ‘चंदू चॅम्पियन’मधील अभिनयासाठी त्याचा हा गौरव होणार आहे. याचबरोबर मामूटी यांना ‘ब्रमायुगम’ (मल्याळी) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ला जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपटाचा पुरस्कार ‘मोग आसुम’ला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट म्हणून ‘मिथ्या’ची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘अमरन’ (तमिळ)साठी जी.व्ही. प्रकाश कुमार यांना जाहीर झाला आहे. तर हिंदी चित्रपटांच्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ‘आर्टिकल 370’करता शाश्वत सचदेव यांना मिळणार आहे.
34 भाषांमधील जवळपास 400 फीचर फिल्म्सवर विचार करण्यात आला, हे अत्यंत मोठे काम होते, कारण अनेक युवा फिल्ममेकर्सनी वेगवेगळे प्रयोग केले आणि नव्या विचारांसह चित्रपट निर्माण केले. हे अत्यंत व्यग्र काम होते, परंतु आम्ही योग्य निर्णय घेतले असे माझे मानणे असल्याचे ज्यूरी सदस्य आणि मल्याळी फिल्ममेकर जयराज यांनी म्हटले आहे.
पुरस्कार विजेत्यांची यादी
पुरस्काराचे नाव विजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपट आर्टिकल 370
सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन), ममूटी (ब्रमायुगम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतम (आर्टिकल 370)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी (अमरन)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री रुपाश्री वरकाडी (मिथ्या), सचना नमिदास (महाराजा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संजय मिश्रा (भक्षक)
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट कॅप्टन मिलर
सर्वोत्कृष्ट बालकलाकार रिद्धिमान बॅनर्जी, तपोमय देव, गीताश्री चक्रवर्ती, अरुण देव पोथुला, आतिश एस. शेट्टी
सर्वोत्कृष्ट पटकथा ब्रमायुगम, शहनाद जलाल
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक वेंकाथी अटलुरी (लकी बास्कर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अभय जोधपूरकर
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका वैकोम विजयालक्ष्मी
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन विजय गांगुली (स्त्राr 2)
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट मिथ्या
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी
सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट मोग असुम
सर्वोत्कृष्ट मल्याळी चित्रपट फेमिनिची फातिमा
Comments are closed.