मनोरुग्ण महिलेने मंदिराच्या तलावात विवस्त्र अवस्थेत उडी मारुन स्वत:ला संपवलं

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील मियापूर परिसरात शनिवारी एका धक्कादायक घटनेत, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या २५ वर्षीय माजी महिला तंत्रज्ञाने मंदिराच्या तलावात उडी मारून आत्महत्या केली.

पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की, पीडित महिला आणि तिची आई दोघीही तीव्र मानसिक तणाव आणि भीतीने त्रस्त होत्या. पीडितेच्या आई-वडिलांमधील वैवाहिक वादामुळे तिचे वडील विशाखापट्टणम येथे राहतात. पीडित महिला आणि तिची आई हैदराबादमधील पीरजाडीगुडा येथे राहत होत्या.

Shekhar Suman on Sonam Wangchuk | “सर्व प्रेतांमध्ये तो एकटाच जिवंत आहे” ‘शेखर टुनाईट’मध्ये शेखर सुमन सोनम वांगचुक यांच्यासाठी भावूक

नेमकं काय प्रकरण आहे?

१७ जुलै रोजी, ती आणि तिची आई खरेदी करण्याच्या उद्देशाने शहरातील मियापूर या परिसरातील एक डबल-बेडरूम अपार्टमेंट पाहण्यासाठी गेल्या होत्या. घरी परतल्यानंतर त्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपल्या. नंतर, मृत महिलेने तिच्या आईची खोली बंद केली, विवस्त्र अवस्थेत जवळच्या मंदिरात गेली आणि तेथील एका तलावात उडी मारली.

पोलिसांनी तलावातून मृतदेह बाहेर काढला.

शनिवारी सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि त्यांनी तलावातून मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनानंतर मृतदेह महिलेच्या आईच्या ताब्यात देण्यात आला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. तपास सुरू आहे.

Comments are closed.