नवलच! – चिनी ‘हायस्पीड!’
>> अरुण
चिन्यांच्या अनेक गोष्टी गूआणि बुचकळ्यात टाकणाऱ्या. मैत्रीचा ‘पंचशील’ करार करून आक्रमण करण्याची त्यांची कृती हा याच वृत्तीचा भाग. मात्र त्यांच्या जगभरचं मार्केट हडप करणाऱ्या छोटय़ा मोठय़ा वस्तू ही अनेक देशांची डोकेदुखी असली तरी त्यांच्या कामाचा झपाटा अजबच. हडेलहप्पी राजवटीमुळे असेल किंवा स्वयंशिस्तीने, पण त्यांच्याकडचे किती तरी प्रकल्प हातोहात, रातोरात पूर्ण होतात आणि जगालाही चकित करतात.
अशीच एक गोष्ट एका चिनी रेल्वेमार्गाची. एरवी ज्या दोन शहरांना जोडणारा प्रवास सात तासांचा असायचा तो चिनी तंत्रज्ञांनी 9 तास अथक काम करून अवघ्या 90 मिनिटांवर आणला! तोसुद्धा कायमचा! नॅनलाँन्ग हायस्पीड रेल्वेचं काम हे इतक्या वेगात केलं गेलं की, जगाने त्याचं कौतुक केलं. फ्युजियन प्रांतामधल्या या रेल्वेमार्गासाठी तिथल्या तंत्रज्ञांनी 1500 कुशल कामगारांची ‘फौज’ घेऊन कामाला सुरुवात केली. हा या मार्गाचा शेवटचा टप्पा असावा. कामगारांचं काम कुठेही ओव्हरलॅपिंग होणार नाही, म्हणजे परस्परांच्या कामात कोणाचा अडथळा निर्माण होऊ नये असं ‘मिनिट टू मिनिट’ प्लॅनिंग ठरवलं गेलं.
या कामात ट्रक लेइंग म्हणजे ‘फिशप्लेट्स’ टाकून त्यावर रूळ ‘अंथरणे’, त्या मार्गावरची सिग्नल यंत्रणा त्याच वेळी दुसऱया पथकाकडून उभारणे आणि या मार्गाचा विद्युत पुरवठा करणाऱया तारा टाकून ट्रेन त्वरित धावू शकेल अशीही व्यवस्था निर्माण करणे एवआव्हानं होती. फिशप्लेट्सवर रूळ बसवून तयार केलेले प्री- फॅब्रिकेटेड ‘ब्लॉक’ सपाट जमिनीवर मिलिमीटरचाही फरक न करता (आपण तसूभरही फरक नाही म्हणतो तसं) त्यांनी जोडत नेले.
सर्व कामगार आपलं काम तंतोतंत आराखडय़ानुसार करत होते. परिणामी जवळपास 246 किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार झाला. याला अर्थातच, रूळ ‘टाकणाऱया’ प्रचंड यंत्रांची साथ होती. तशी पिवळय़ा रंगाची यंत्रं आता आपल्याकडेही आहेत. त्यांना ‘ट्रक रिन्युअल ट्रेन’ असं म्हटलं जातं. मालगाडीसारखीच ही ट्रेन रूळ पसरत जाते. त्या यंत्रांना टीआरी किंवा ट्रक लेइंग जेन्ट्री म्हणूनही ओळखली जाते.
असे रूळ अंथरण्यापूर्वी ‘टॅम्पिंग’ मशीन काम करतं म्हणजे रेल्वे रुळांमधल्या खडीचं दाब देऊन सपाटीकरण करतं. आपल्याकडे ऑस्ट्रेलियातील ‘प्लॅसर अॅन्ड थुरर’ कंपनीच्या सहयोगातून बनवलेलं ‘प्लॅसर इंडिया’ कंपनीचं यंत्र वापरतात. हे काम पाहणंसुद्धा चकित करणारं असतं.
Comments are closed.