रेल कामगार सेनेतर्फे आशीष मिर्झा यांचा सत्कार
मध्य रेल्वेच्या मुख्य कार्मिक अधिकारी कार्यालयातील ‘चीफ वेल्फेअर इन्स्पेक्टर’ आशीष मिर्झा हे रेल्वे सेवेत 39 वर्षे सेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रेल कामगार सेनेतर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रेल कामगार सेना अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत, कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या वतीने तसेच सरचिटणीस, शिवसेना उपनेते दिवाकर (बाबी) देव यांच्या नेतृत्वाखाली सहकार्याध्यक्ष भरत शर्मा, मुंबई विभागीय सचिव तुकाराम कोरडे, भायखळा इन्स्टिटय़ूट कमिटी सदस्य मिलिंद झिंगे व सुनील आघाव यांनी मिर्झा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आशीष मिर्झा हे निष्ठावंत शिवसैनिक असून सामाजिक व संघटनात्मक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
Comments are closed.