ठाकरेंच्या हाती सभेत दाखवण्यासाठी रुद्राक्षांची माळ, तोंडी औरंगजेबाचाच जप; आशिष शेलारांचा प्रहा

उधव ठाकरे वर आशिष शेलर: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बऱ्यापैकी यश मिळवले होते. ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीपर्यंत चित्र पालटलं. विधानसभेला उद्धव ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार निवडून आले.  तर काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे रक्षण करणे हेच भाजपचे हिंदुत्व आहे काय?, असा संतप्त सवाल करत भाजपवर निशाणा साधला होता. आता राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले, महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील “छावा” सिनेमा आला. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला. “छावा” वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा “सामना” सोडून जगभरातील लिहिणारे, बोलणारे बोलत आहेत. स्वागत करीत आहेत. कुंभमेळा भरला, महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करुन आले. सभेत दाखवण्या पुरती हातात रुद्राक्षाची माळ घातली. औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी, ओळखलेत का? महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी? असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

‘डॅमेज कंट्रोल’साठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसून येत आहे. आता नाशिकमधून ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये येणार आहेत. पक्षातील गटबाजी आणि गळती रोखण्याचे संजय राऊत यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. संजय राऊत आज नाशिकमधील काही प्रमुख पदाधिकार्‍यांची आढावा बैठक घेणार आहेत. शिंदे गटाकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के दिले जात असल्याने ठाकरे गट सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. डॅमेज कंट्रोल करण्यात संजय राऊत यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://www.youtube.com/watch?v=ZF-bmvwwypytk

आणखी वाचा

Sanjay Raut : गृहराज्यमंत्री दिव्य, पुण्यातील गुंडांकडून निवडणुकीत भाजप अन् राष्ट्रवादीला मदत, स्वारगेट प्रकरणावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

अधिक पाहा..

Comments are closed.