दबावाची भीती, रात्रीचे 11 वाजता गुंडास्कॉड अशोक खरातच्या घरात घुसले; पोलिसांकडून चोरनीताचा वापर

मुंबई : नाशिकमधला भोंदू बाबा अशोक खरात विकृत कारन्याम्याने महाराष्ट्र हादरला असून महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या त्याची एसआयटी चौकशी सुरू आहे. खरातच्या कार्यालयातील महिलांच्या लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाले असून पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. त्यामध्ये, याप्रकरणात आणखी कोण कोण आरोपी किंवा सहआरोपी होऊ शकतं, कुणाचे आर्थिक व्यवहार खरातसोबत आहेत, यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना हवी आहेत. त्यामुळे, नाशिकच्या (Nashik) सत्र न्यायालयाने देखील 29 मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज नाशिकचे पोलीस (Police) आयुक्त संदीप कर्णिक यांनी एबीपी माझाशी बोलताना अशोक खरातच्या तपासाचा थरार सांगितला.

अशोक खरातला 17 मार्च रोजी अटक करण्यात आली असून नाशिक गुन्हे शाखा 1 ने याचा तपास केला आहे. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक करण्याचे मिशन राबवले असून रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपीला त्याच्या घरातून उचलल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

अशोक खरातला पकडण्याचं ऑपरेशन हे अत्यंत गोपनीय होतं, कारण आरोपीचे शिष्य, भक्तगण हे सर्वच क्षेत्रात पसरलेले आहेत. त्यामुळे, जर हे ऑपरेशन लीक झालं असतं तर आरोपी पळून गेला किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला असता. आरोपीला कुठल्याही गोष्टी न समजू देता किंवा त्याला अलर्ट न होऊ देता त्याला अटक करणे महत्त्वाचं होतं. त्यानंतर, महिला तक्रारदारास विश्वासात घेऊन तक्रार नोंद करुन घेणं गरजेचं असतं. त्यामुळे, खरातच्या अटकेची प्रक्रिया किंवा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया ही पोलीस खात्यातल्या काहीच जणांना माहिती होती, अशी माहिती कर्णिक यांनी दिली. तसेच, आधी महिलेची फिर्याद घेतली, त्यानंतर अशोक खरातच्या अटकेची कारवाई सुरू झाली. रात्री 11 वाजता आरोपी खरात घरी असल्याची खात्री केल्यानंतर, त्याचं लोकेशन बघूनही, तसेच आम्हाला इन्टेलिजन्सही होतं की, तो याच परिसरात आहे.

चोर घरात असल्याची अफवा पसरवली

आरोपीला पोलीस मागावर असल्याचं कळालं असतं तर त्याने दबाव टाकून किंवा कायदेशीर लढाईच्या माध्यमातून दबाव टाकला असता, असे कर्णिक यांनी सांगितले. आमचे गुंडास्कॉडची अधिकारी आणि त्यांच्या स्टाफने या परिसरात चोर आल्याची अफवा पसरवली. त्यानंतर, ते आरोपीच्या घरात घुसले. आपल्याच घरात चोर आल्याचं कळाल्याने ती व्यक्ती देखील स्वत:च्या सुरक्षेसाठी शांत होती. मात्र, पोलिसांच्या पथकाने या घरातील एका रुममध्ये असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर, आरोपीला पोलीस स्टेशनला आणून अटक करण्यात आली. रात्री 9 वाजल्यापासून आमच्या टीम आरोपीच्या मागावर होत्या, पण जेव्हा आम्ही तपास सुरू केला तेव्हा 15 मिनिटांत अशोक खरातच्या मुसक्या आवळल्याचं संदीप कर्णिक यांनी सांगितले.

हेही वाचा

मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!

आणखी वाचा

Comments are closed.