रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांची Exclusive मुलाखत
मुंबई : अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर त्याचे राजकीय लागेबंध समोर आले. त्यानंतर याच प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना (Rupali Chakankar) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु आता त्यांची चौकशी करावी, त्यांना सहआरोपी करावं अशी मागणी विरोधकांनी केली. यासंबंधी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी मोठी माहिती दिली. या प्रकरणात तपास सुरू असून पुढे काही गोष्टी समोर आल्या तर योग्य ती कारवाई केली जाणार असं ते म्हणाले. संदीप कर्णिक हे एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात बोलत होते.
शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या अशोक खरातला अटक करण्यात आली असून त्या प्रकरणी तपास सुरू आहे. अशोक खरातसोबत अनेक राजकीय लोकांचे फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप केला जाऊ शकतो असा सूर विरोधकांनी लावला. त्यावर आता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसाची भूमिका स्पष्ट केली आहे.
अशोक खरात प्रकरणः पोलिसांवर राज्याचा उंबरठा?
अशोक खरातला अटक करत असताना किंवा त्याची चौकशी सुरू असताना कुणाचा राजकीय दबाव आला का असा प्रश्न कर्णिक यांना विचारण्यात आला. त्यावर कर्णिक म्हणाले की, खरातला अटक केल्यानंतर कुणाचाही फोन आला नाही, किंवा दबाव टाकण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही.
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांची चौकशी होणार का?
या प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा आणि त्यांची चौकशी करा अशी मागणी केली जात आहे. यावर बोलताना संदीप कर्णिक म्हणाले की, “आमच्याकडे सुरुवातीला जी तक्रार आली होती, त्यानुसार या प्रकरणात कुठल्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग नव्हता किंवा दबाव नव्हता. पण आम्ही आरोपीला अटक केल्यानंतर काही गोष्टी बाहेर आल्या. शिर्डीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला गेला होता किंवा इतर ठिकाणी काही झालं होतं हे नंतर समोर आलं.”
नाशिक व्यतिरिक्त इतर ठिकाणी काही गुन्हे झाले आहेत ते सर्व विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आहेत. पुढे मागे यातून काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असं संदीप कर्णिक म्हणाले.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.