पतसंस्थांमध्ये खरात नॉमिनी असलेली 100 हून अधिक खाती; चाकणकर नावाचेही खातं, पोलिसांनी विचारताच अ

अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अशोक खरात प्रकरणी सुरु असलेल्या तपासात मिळालेल्या माहितीनूसार नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अशोक खरातने विविध मालमत्तांची मोठी खरेदी केली आहे. अशोक खरातने 4 वर्षांत 70 कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याचे एसआयटी तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे खरातनं सारे व्यवहार रोख पैशांत केले होते.

अशोक खरातने चार वर्षांत 70 कोटींची खरेदी केली प्रॉपर्टी- (Ashok Kharat Property)

अशोक खरातच्या कॅशनेच व्यवहार करत असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. अशोक खरातने रोख व्यवहारातून आर्थिक साम्राज्य उभं केलं. 3 दिवसांत अशोक खरातच्या  बँक खात्यांची तीनवेळा एसआयटीने तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. कोणताही अधिकृत हिशोब नसल्याची शक्यता आहे.  व्यवहारांची साखळी उलगडण्यास सुरुवात झाली असून मोबाईलमधून डेटा जप्त, महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. अशोक खरातने चार वर्षांत सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. नाशिक, पुणेअहिल्यानगरमध्ये अशोक खरातने मोठी गुंतवणूक केली आहे. अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावे आहेत. शिर्डी पतसंस्थांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावे खाते उघडून या खात्यांवर अशोक खरात हा व्यवहार करत होता.  खरात हा सावकारीचे काम करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करत होता. यातील अनेक व्यवहार हे समता व जगदंबा या दोन पतसंस्थांच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या पतसंस्थांना पत्र देऊन खात्यांची माहिती मागवली आहे.

पंतसंस्थेच्या अनेक खात्यांमध्ये खरात वारसदार- (Ashok Kharat Case)

कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा दोन नावांनी खाते असल्याची माहिती आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा आहे.

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: जरा मोठ्याने बोल…न्यायाधीशांचे 2 प्रश्न; अशोक खरातचे हात जोडून उत्तर, आजच्या सुनावणीत काय काय घडलं? A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.