अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंध
मुंबई : भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्या तपासान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, हे प्रकरण केवळ महिला लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून व्यापक स्वरूपाचे प्रकरण असल्याचा दावा समोर आला आहे. या प्रकरणाचा ‘लॉजिकल एंड’ गाठायचा असेल, तर सर्व संबंधित पैलूंची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) व्यक्त केलं आहे.
तर या प्रकरणात अद्याप अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आणि संस्थांची चौकशी झालेली नाही. शिवनिका ट्रस्ट, काही ब्लॉगर तसेच नामकरण आवारे यांची चौकशी अद्याप बाकी असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, चाकणकर यांच्याबाबतही चौकशी न झाल्याचा मुद्दा सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे. या संदर्भात सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री यांची भेटीसाठी वेळ मागितली असून, काही महत्त्वाची माहिती थेट त्यांच्या समोर मांडण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. काही संवेदनशील बाबी सार्वजनिकपणे मांडता येत नसल्याने हा विषय अत्यंत सावधगिरीने हाताळण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणात काही माजी व विद्यमान लोकप्रतिनिधींचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली असून, त्या अनुषंगानेही चौकशीची मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. खरात यांच्या पत्नीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी, तसेच ‘व्यंकटेश’ कंपनीतील व्यवहारांची चौकशी करण्याचीही मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे.
यासोबतच, संबंधित प्रकरणात नाव येत असलेल्या अधिकारी भांडे यांचे निलंबन करावे, अशीही मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. तसेच सृष्टी खरात यांच्याबाबतही चौकशी व्हावी, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. एकूणच, या प्रकरणाचा तपास व्यापक पातळीवर होऊन सर्व संबंधित बाबी समोर येण्याची अपेक्षा सुषमा अंधारेंनी व्यक्त केली जात आहे.
अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज (1 एप्रिल) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात अशोक खरातला हजर केलं होतं. अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सध्या एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरातविरोधात नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत. अशोक खरातने केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चालली आहे. त्यामुळे अशोक खरातची कोठडी वाढवण्याची मागणी एसआयटीकडून करण्यात आली. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली होती. (Ashok Kharat Case)
आणखी वाचा
Comments are closed.