मॅर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी ते कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट, एकनाथ शिंदे, चाकणकर, विखे-पाटलांसारखे हा
नाशिक : नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणात एका अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याला अटक केली आहे, आज त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरात (Ashok Kharat) हा लोकांचे भविष्य सांगत होता, त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते, स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) या भोंदू बाबा विरोधात एका महिलेने फिर्याद दिली आहे, स्वतः कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास संपादन करून त्याने ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकार सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे.(Ashok Kharat)
पोलिसांनी अशोक खरातची चौकशी करताना त्याच्याकडून तब्बल 58 व्हिडीओ जप्त करण्यात आले आहेत, नामांकित महिला, सेलिब्रिटी संदर्भात काही व्हिडीओ असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या प्रकरणात उडी घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच अशोक खरात याचे राजकीय नेते सेलिब्रिटी यांच्या सोबत उठबस असल्याचेही अधोरेखित केले आहे, सिन्नर तालुक्यात अशोक खरात याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे, या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनाही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता, आता पोलीस तपासत आणखी काय माहिती समोर येते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे, एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा तर दुसरीकडे देवस्थानच्या विश्वस्त असणाऱ्या रूपाली चाकणकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.(Ashok Kharat)
काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत संशयित अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आज (बुधवार १८ मार्च) खरात याला पहाटे ३ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात सध्या अधिक चौकशी सुरु आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असून, त्याची सत्यता पडताळण्यात येत आहे.(Nashik Crime news)
कोण आहे अशोक खरात उर्फ ‘ स्वघोषित कॅप्टन’ ?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचं खरं रुप समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांच्या कारकिर्दीत खरातने १५४ देशांचे दौरे पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याचे मानले जाते. खरातने आपले लक्ष ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) नावाच्या विज्ञानशाखेच्या अभ्यासाकडे वळवले, तेव्हा त्याच्या आयुष्याला रंजक वळण मिळालं. कॉस्मॉलॉजीने गेल्या १०० वर्षांत प्रचंड प्रगती साधली आहे. आइन्स्टाईन यांच्या १९१७ मधील विश्वाच्या ‘स्थिर प्रतिमाना’द्वारे (static model) सैद्धांतिक भौतिकशास्त्राची एक शाखा म्हणून याची सुरुवात झाली; आणि सुरुवातीच्या काळात, विशेषतः लेमैत्र (Lemaître) यांच्या कार्यामुळे या शाखेचा विकास झाला.
आणखी वाचा
Comments are closed.