अशोक खरातने शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलं, एकाचा घातपात, तिघांनी आयुष्यच संपवलं?
अशोक खरात प्रकरण: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी पकडल्यानंतर आता त्याचे काळे कारनामे एक-एक करुन समोर येत आहेत. अशोक खरात (Ashok Kharat) याने 100 पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा संशय आहे. मात्र, याच अशोक खरातने नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना (Farmers) देशोधडीला लावल्याची नवी माहितीही आता समोर येत आहे. नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहता या ठिकाणी शेकडो कोटींचा स्थावर मालमत्ता जमवणाऱ्या खरातने शेतकऱ्यांची फसवणूक केली होती, अशी माहिती समोर आली आहे. खरात याने शिर्डी (Shirdi News) परिसरात मोठ्याप्रमाणावर मालमत्ता खरेदी केल्या होत्या. शिर्डीतील एका आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबाला अशोक खरातने कर्ज म्हणून पैसे दिले होते. या कुटुंबाच्या मालकीचे एक लॉन्स होते. यावर अशोक खरात याचा डोळा होता. या कुटुंबाने अशोक खरात याचे कर्ज फेडल्यानंतरही त्याने त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. अशोक खरात या कुटुंबाला सातत्याने धमकावत होता. आपल्या मंत्री, बडे सरकारी अधिकरी आणि पोलिसांशी ओळखी असल्याचे तो सांगायचा. अखेर या कुटुंबाने या त्रासाला कंटाळून शिर्डीतील लॉन्स खरातच्या नावावर करुन दिला. मात्र, दरम्यानच्या काळात खरातच्या त्रासाला कंटाळून या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली होती. अशोक खरात याने अशाचप्रकारे त्रास देऊन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचे सांगितले जाते. (Nashik Crime news)
याशिवाय, नाशिक शहरातील गौळणे भागात कैलास जाधव या शेतकऱ्याने एका जागेचा व्यवहार केला होता. या व्यवहाराचे साठे खतही झाले होते. मात्र, अशोक खरातला ही जमीन आवडल्याने त्याने परस्पर ही जमीन खरेदी केली. या व्यवहारात संबंधित शेतकऱ्याची 47 लाख रुपयांची फसवणूक झाली. त्यामुळे शेतकरी कैलास जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर न्यायालयाकडून या जमीन खरेदी व्यवहाराला स्थगिती मिळण्याची दाट शक्यता दिसत होती. मात्र, त्यापूर्वीच कैलास जाधव यांना अपघाती मृत्यू झाला होता. या मृत्यूमागे घातपात असावा, असा संशय जाधव कुटुंबीयांना आहे.
Ashok Kharat Property: अशोक खरातच्या नाशिकमधील मालमत्ता
1. पाथर्डीत 150 कोटींची 30 एकर जमीन
2. सिन्नरच्या कहांडळवाडीत 5 कोटींची 45 एकर जमीन
3. पाथर्डी, गौळणे 30 कोटींच्या जमिनी
4. सिन्नरमध्ये 1 कोटींचे व्यापारी गाळे
5. मीरगावातील फार्म हाऊसची किंमत 10 कोटींच्या घरात
6. अहिल्यानगरमध्ये 5 एकरांचा भूखंड
7. ओझर विमानतळाजवळ 5 एकर जमीन
8. जानोरी, दहावा मैल भागात मोक्याच्या ठिकाणी जमिनी
९. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात कार्यालय
10. कर्मयोगीनगरमध्ये 5 कोटींचा बंगला
11. शिर्डीच्या पानमळ्यात 30 गुंठे जागा
12. निघोजमध्ये 4 एकर जागा
13. शिर्डीत 70 कोटींच्या जमिनी, प्लॉट
14. सिन्नरमध्ये मोक्याच्या जागांवर दुकाने
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.