अशोक खरातला स्वत: केलेली ‘ती’ तक्रार भोवली, 29 डिसेंबरचा फिर्यादीच 18 मार्चला आरोपी झाला, नेमकं
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकला हादरवून सोडणाऱ्या कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक वळण समोर आले आहे. स्वतःला खंडणीसाठी धमकावले जात असल्याची तक्रार करणारा अशोक खरातच अवघ्या काही महिन्यांत गंभीर गुन्ह्यात आरोपी ठरला आहे. 29 डिसेंबर 2025 रोजी पोलिसांत फिर्याद देणारा खरात 18 मार्च 2026 रोजी अटकेत गेला आणि याच प्रवासाने या संपूर्ण प्रकरणातील गुंतागुंत उघड केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, खरातने 29 डिसेंबर रोजी सिन्नरमधील वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात पुण्याचा राजेंद्र जासूद आणि मुंबईतील दिनेश परब हे महिलांचे फोटो दाखवून आपल्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागत असल्याचा आरोप त्याने केला होता. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला; मात्र तपासाची दिशा पुढे सरकताच चित्रच पालटू लागले.
Ashok Kharat Nashik Crime News: 29 डिसेंबरचा फिर्यादीच 18 मार्चला आरोपी झाला
दरम्यान, 12 मार्च 2026 रोजी शिर्डीत नीरज जाधव नावाच्या व्यक्तीविरोधात एका युवतीने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि विविध धागेदोरे एकत्र येऊ लागले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने ज्या महिलांचे फोटो खंडणीसाठी वापरले जात असल्याचा दावा केला होता, त्याच महिलांचे शोषण स्वतः त्यानेच केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर 18 मार्च 2026 रोजी नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली.
Ashok Kharat Nashik Crime News: तपासासाठी एसआयटीची स्थापना
तपासात पुढे येत असलेल्या माहितीनुसार, खरात महिलांना दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधींचे आमिष दाखवून आपल्या संपर्कात आणत असे. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून गुंगीकारक पदार्थ देत अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकारचे तब्बल 58 व्हिडिओ क्लिप्स असल्याची माहितीही समोर आली असून प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. दरम्यान, पोलिसांनी खरातच्या घरावर आणि फार्महाऊसवर छापे टाकून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे. गुरुवारी (दि.19) सकाळी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत अशोक खरातची दोन तास कसून चौकशी केली आहे.
Who Is Ashok Kharat: कोण आहे अशोक खरात?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.