अशोक खरातने 60 लाखांची जमीन अवघ्या 22 लाखांत बळकावली, आता भोंदूबाबाला मदत करणाऱ्या जमीन एजंट अन
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: भोंदूगिरी आणि हवाला रॅकेटच्या खुलाशानंतर आता अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे जमीन बळकावण्याच्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात आता अनेक मोठे जमीन खरेदी-विक्री एजंट आणि नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी एसआयटीच्या (SIT) रडारवर आले असून त्यांची लवकरच कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: 60 लाखांची जमीन 22 लाखांत बळकावली
अशोक खरातने एका फिर्यादीची तब्बल 60 लाख रुपये किमतीची जमीन केवळ 22 लाख रुपयांत बळकावल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या व्यवहारात खरात आणि फिर्यादीची ओळख एका एजंटच्या माध्यमातूनच झाली होती. संबंधित एजंटने खरातच्या भोंदूगिरीला खतपाणी घालत फिर्यादीची फसवणूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: महसूल अधिकारी देखील एसआयटीच्या रडारवर
केवळ खासगी एजंटच नव्हे, तर नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महसूल अधिकारी देखील खरातच्या संपर्कात होते असा संशय एसआयटीने व्यक्त केला आहे. नियमांना बगल देऊन जमिनीचे फेरफार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा जमिनीच्या व्यवहारात खरातला कायदेशीर पळवाटा शोधून देणे, यासाठी या अधिकाऱ्यांनी मदत केली आहे का? या दृष्टीने आता तपास चक्रावली आहेत.
Ashok Kharat Nashik Crime News: आर्थिक व्यवहारांतून एजंटचे धागेदोरे स्पष्ट
एसआयटीने जेव्हा अशोक खरातच्या बँक खात्यांचे आणि इतर आर्थिक व्यवहारांची तपासणी केली, तेव्हा त्यात अनेक जमीन ब्रोकरसोबतचे मोठे व्यवहार संशयास्पद आढळले आहेत. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांनी खरातला सहकार्य केले? नाशिकसह इतर जिल्ह्यांतील एजंटनी अशाच प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली? ‘ब्लॅक मनी’ पांढरा करण्यासाठी या जमिनींच्या व्यवहारांचा वापर झाला आहे का? असा संशय आता व्यक्त केला आहे. आता जमीन खरेदी विक्री एजंट, महसूल अधिकाऱ्यांच्या चौकशीत नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.