भोंदू अशोक खरातचा ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यातही सहभाग? दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना भावासाठी ‘स
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकचा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती आता केवळ अध्यात्म आणि जमिनीपुरती मर्यादित राहिलेली नाही. राज्याच्या शिक्षण विभागातही खरातने आपले वजन वापरून ‘शालार्थ आयडी’ घोटाळा केल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या कार्यकाळात खरातने आपल्या भावासाठी नियमांना बगल देऊन हा आयडी मिळवल्याची चर्चा आता रंगली आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: भावासाठी ‘राजकीय’ वजनाचा वापर?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हा सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2022 मध्ये जेव्हा दीपक केसरकर राज्याचे शिक्षणमंत्री होते, त्या काळात दिलीप खरात याला ‘शालार्थ आयडी’ मिळवून देण्यात आला. हा आयडी मिळवण्यासाठी अशोक खरातने आपली राजकीय ऊठबस आणि वजन वापरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: शिक्षण विभागात ‘दबक्या आवाजात’ चर्चा
शालार्थ आयडी मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि पारदर्शक असते. मात्र, खरातने थेट मंत्रालयातील किंवा शिक्षण विभागातील वरिष्ठ स्तरावर मध्यस्थी करून ही फाईल मंजूर करून घेतल्याचे बोलले जात आहे. आयडी खरा की बोगस? दिलीप खरात याला मिळालेला हा शालार्थ आयडी कायदेशीर प्रक्रियेतून मिळाला आहे की तो ‘बोगस’ आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. इतर फाईल्सचे काय? केवळ भावासाठीच नाही, तर शिक्षण विभागातील अनेक प्रलंबित फाईल्स खरातने आपल्या ‘सेटिंग’ने मार्गी लावल्याची चर्चा शिक्षण विभागात दबक्या आवाजात सुरू आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: दीपक केसरकरांचे नाव चर्चेत
या प्रकरणात थेट माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे नाव जोडले गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरातने केसरकरांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नावाचा वापर करून हे काम फत्ते केले का? याची चौकशी होण्याची मागणी होत आहे. जर हा शालार्थ आयडी चुकीच्या पद्धतीने दिला गेला असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार असू शकते.
Ashok Kharat Nashik Crime News: चौकशीचा घेरा वाढणार?
अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या प्रत्येक आर्थिक आणि सामाजिक संबंधांची तपासणी सुरू आहे. आता शिक्षण विभागातील या ‘शालार्थ आयडी’ कनेक्शनमुळे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. एसआयटी (SIT) या प्रकरणाची कागदपत्रे पडताळून पाहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
दरम्यान, अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी एसआयटी, सायबर तज्ञ आणि फॉरेन्सिक टीमकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या डेटामधून मोठे आर्थिक व्यवहार आणि धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरातचे कोणाकोणाशी आर्थिक संबंध होते याचाही तपास सुरू असून संबंधित व्यक्ती एसआयटीच्या रडारवर आहेत. पुराव्यांच्या आधारे समक्ष चौकशी करण्यासाठी न्यायालयाने अशोक खरातला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.