…तर पिसाट खरातची ‘वरात’ निघून तेव्हाच ‘शक्ती’ नाहीशी झाली असती; पण रुपाली चाकणकरांकडून खरातचं

अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्याविरोधात कारवाईचा फास आवळला जात असतानाच अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. इतक्या गंभीर आरोपांनंतरही याआधी त्याच्यावर ठोस कारवाई का झाली नाही? त्याला कुणाचा राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त होता का? अशा चर्चांना आता जोर आला आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: ‘बिंग फोडणाऱ्यावरच गुन्हा’

अशोक खरात याची चौकशी सुरू झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. अशोक खरात याचे बिंग ज्याने फोडले त्याच नीरज जाधववर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेचे बनावट फोटो व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी त्याच्यावर फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता.

Ashok Kharat Nashik Crime News: 5 कोटींच्या खंडणीचा गुन्हा

याआधी 29 डिसेंबर 2025 रोजी अशोक खरात याने सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात 5 कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती. मुंबईतील हॉटेल व्यावसायिक दिनेश तानाजी परब यांच्याशी जुनी ओळख असल्याचे सांगत, राजेंद्र अशोक जासूद या व्यक्तीकडे आपले आक्षेपार्ह फोटो असल्याचा दावा करून हे प्रकरण ‘सेटल’ करण्यासाठी 5 कोटींची मागणी झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. मात्र, या गुन्ह्यात तत्काळ कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद झाला. आरोपी जासूद याला जामीन मिळाल्याची माहिती असून, परब यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही समोर येत आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: ‘बचावासाठी हालचाली’ आणि दबावाची चर्चा

वावी प्रकरणानंतर स्वतःचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचे लक्षात येताच खरातने स्वतःचा बचाव करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे बोलले जाते. त्यानंतरच नीरज जाधव याच्यावर शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यावेळी रुपाली चाकणकर यांच्याकडून अधिकाऱ्यांना नीरज जाधव याच्यावर कारवाईसाठी दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: SIT तपासात उघड होणार धागेदोरे?

नाशिकमधील प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता शिर्डी आणि वावी येथील दोन्ही गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक (SIT) मार्फत केला जात आहे. खरातचे मंत्री, अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्यामुळे याआधी त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ झाली का? असा संशय व्यक्त केला जात आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिक पोलिसांची तत्परता, मात्र प्रश्न कायम

नाशिक शहर पोलिसांनी गोपनीयतेत कारवाई करत खरातला अटक केली. मात्र, हीच तत्परता ग्रामीण पोलिसांनी आधी दाखवली असती, तर खरातला आधीच अटक होऊ शकली असती, असेही बोलले जात आहे. एकूणच, अशोक खरात प्रकरणात आता केवळ गुन्ह्यांचा तपासच नाही, तर त्यामागील ‘संरक्षण’ आणि ‘प्रशासकीय निष्क्रियता’ यांचाही शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पुढील तपासात या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat: अशोक खरात पूजा करुन 20 फुटी भुजंगाला बोलवायचा, भक्त भीतीने थरथर कापायचे, दरबारात नेते मंडळींच्याही रांगा; भोंदूबाबाची हादरवणारी कहाणी

आणखी वाचा

Comments are closed.