करिअरचा सल्ला घेण्यासाठी गेली, आई-बाबांना केबिन बाहेर पाठवून अशोक खरातने नको नको ते केले; तरुणी

अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता अशोक खरातविरोधात 7 वा गुन्हा दाखल झाला आहे. शिर्डीत अशोक खरातविरोधात काल पीडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे.

अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याची पीडित मुलीची तक्रार आहे. अशोक खरातनं गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे. वाच्यता केल्यास दैवी शक्तीने आई-वडिलांना मारुन टाकीन अशी धमकीही दिली. जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान अशोक खरातने चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा, म्हणत पीडित तरुणीचे कुटुंब अशोक खरातकडे गेले होते. तिसऱ्या भेटीत मुलीनं कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, अशी विचारणा कुटुंबीयांकडून करण्यात आली. यावेळी पीडितेसोबत अशोक खरातने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

शिर्डीत अशोक खरातविरोधात नवीन तक्रार दाखल- (FIR Against Ashok Kharat In Shirdi)

तांब्याच्या ग्लास मधील पाणी पाजून नियंत्रण मिळवत अत्याचार केल्याचा दावा पीडित तरुणीने केला आहे. स्वतःला “महादेवाचा अवतार” असल्याचे सांगत कोणाला काही न सांगण्याची भीती दाखवून अत्याचार केला. विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी, वडिलांचा मृत्यू होण्याची घातली अशोक खरातने भीती दाखवली. सुरवातीला शेतात घर कुठे बांधावे, त्याचा मुहूर्त काय हे विचारण्यासाठी आई वडिलांबरोबर तरुणी 2021 मध्ये भोंदू अशोक खरातकडे गेली होती. जागा बाधित आहे, दोन वर्षे घर बांधू नका, असे सांगत कुटुंबाला पुन्हा बोलावून अशोक खरात घेत होता. कुठल्या फिल्डमध्ये शिक्षण घेऊ,चांगली नोकरी कुठे लागेल असा प्रश्न तरूणीने करताच खरातने तिच्या आई-वडीलांना केबिन बाहेर काढले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रारीत म्हटलं आहे. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार अशोक खरात अत्याचार करत होता, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

आई-बाबांना केबिन बाहेर पाठवून अशोक खरातने नको नको ते केले- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

जुलै 2024 मध्ये मी आई वडिल यांचे सोबत कॅप्टन अशोक खरात यांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीन, नाशिक येथे गेले होते. त्यावेळी आम्ही त्यांना मी कोणत्या फिल्ड मध्ये अॅडमीशन घ्यावे जेणेकरून मला चांगली नोकरी मिळेल याबाबत विचारले होते. तेव्हा अशोक खरात माझे आई वडिलांना बोलला की तुम्ही बाहेर जा मला हिच्याशी काही बोलायचे आहे. त्यावेळी त्याने मला विचारले की तुझे कॉलेज कसे चालू आहे. असे बोलून त्याने मला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पीण्यासाठी दिले ते पाणी पिले असता ते मला थोडे बेचव लागले, त्यानंतर त्याने काहीतरी मंत्र बोलून तो ग्लास माझे डोक्यावर ठेवून मला डोळे बंद करायला सांगितले, आणि मला पण तो बोलेल तसे मंत्र बोलायला लावले व माझे पाठीमागे येऊन उभा राहीला. त्यानंतर आपोआप माझे डोके जड पडू लागले आणि मी तो सांगेल त्याप्रमाणे वागू लागले. त्यावेळी पहिले त्याने मला त्याच्या मिठीत घेतले आणि माझ्या डोक्यावरून, छातीवरून हात फिरवला आणि बोलला की मी महादेवाचा अवतार आहे, माझेकडे दैवी शक्ती आहे, मी तुझे खुप चांगले करीयर घडवील. फक्त मी सांगतो त्याप्रमाणे तू कर असे बोलून मला मंत्र बोलायला लावले. आणि नंतर माझे लैंगिक शोषण केले. त्यावेळी मी विरोध केला तर तो मला बोलला की तू जर मला विरोध केला आणि जर कोणाला काही सांगितले तर मी माझेकडील दैवी शक्तीने तुझे आणि तुझ्या घरच्यांचे आयुष्य उध्वस्त करून टाकीन आणि तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यु होईल अशी भिती घातली. त्यामुळे मी घाबरून तो सांगेल त्याप्रमाणे वागले, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

शिर्डीत अशोक खरातविरोधात गुन्हा दाखल, VIDEO:

संबंधित बातम्या:

Ashok Kharat Case Nashik Crime News: तांब्या घेऊन उभी केली, मिठीत घेतले, छातीवरुन हात फिरवून लैंगिक शोषण केले; अशोक खरातविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!

आणखी वाचा

Comments are closed.