अशोक खरात महिलांना नेमकं कसं संमोहित करायचा? धक्कादायक माहिती समोर

मुंबई : भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरातच्या (Ashok Kharat) जाळ्यात महिला नेमक्या कशा फसल्या हा प्रश्न विचारला जात आहे. त्याचा गोरखधंदा कसा चालायचा याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. आपल्या अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांवर, खासकरून महिलांवर खरात आपल्या बोलण्यानं प्रभाव टाकायचा. भविष्य सांगण्यासाठी, पद टिकण्यासाठी, वरचं पद मिळवण्यासाठीचे फंडे खरात लोकांना सांगायचा आणि आपल्या मनासारखं झालं नाही तर कोप होईल, अशी भीती घालायचा. त्याच्या बोलण्याचा प्रभाव असा होता की महिला संमोहित होऊन जात. याचाच फायदा घेऊन तो महिलांवर अत्याचार करायचा अशी माहिती समोर आली आहे.

नाशिकचा वासनांध भोंदू अशोक खरातच्या काळ्या कृत्यांना एका पीडितेनं मोठ्या हिमतीनं तोंड देत वाचा फोडली. सुरक्षा आणि अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे या पीडितेचं नाव सार्वजनिकरित्या घेतलं जाऊ शकत नाही. मात्र तिनं दाखवलेल्या हिमतीमुळे अनेक महिलांचं होणारं शोषण आणि बदनामी यामुळे टळली आहे.

Ashok Kharat Crime News : कृष्णाचा अवतार असल्याचं सांगायचा

आपण कृष्णाचा अवतार असून तू पूर्व जन्मीची राधा आहेस हे सांगून हा हैवान महिलांचं लैंगिक शोषण करायचा. सुरूवातीला महिलांना पेढा आणि कडवट आणि खारट चवीचं पाणी प्यायला द्यायचा. त्यानंतर महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावून त्यांना चुकीचा स्पर्श करायचा अशी तक्रार नाशिकच्या पीडितेनं केली.

नवऱ्याला मारण्याच्या धमकीनं ब्लॅकमेल करत त्यानं पीडितेचं अनेकदा लैंगिक शोषण केलं. अखेर त्या महिलेने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीनं पोलिसात धाव घेत नराधम खरातचा भांडाफोड केला. या हैवानाचे अनेक व्हिडीओ समोर आले असून अन्याय झालेल्या महिलांनी पुढे येऊन खरातच्या विरोधात तक्रार करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Ashok Kharat Video : 100 हून अधिक व्हिडीओ समोर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांवर अत्याचार केल्याचे तब्बल शंभरहून अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातच्या घरात घेतलेल्या झडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड सापडली असून पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कगदपत्रेही सापडली आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.