अशोक खरातच्या विकृतीचा नवा Video समोर, आईसमोरच मुलीला टी-शर्ट वर करायला सांगितला, नंतर केबल टेस

अशोक खरात व्हायरल व्हिडिओ: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच, आता त्याचा एक अघोरी उपचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नव्या घडामोडीमुळे खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीवर तथाकथित ‘उपचार’ करत असल्याचा व्हिडीओ समोर आला असून, यामुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केलाय. (Nashik Crime News)

Ashok Kharat Viral Video: आईसमोरच अल्पवयीन मुलीला टी-शर्ट वर करायला सांगितला

व्हायरल व्हिडिओमध्ये खरात एका अल्पवयीन मुलीला टी-शर्ट वर करायला सांगताना दिसतो. त्यानंतर तो ‘इंटरनेट केबल टूल’ आणि ‘केबल टेस्टर’सारख्या उपकरणांचा वापर मुलीच्या पोटावर करताना दिसतो. विशेष म्हणजे, हा प्रकार मुलीच्या आईसमोरच केबिनमध्ये घडत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. उपचाराच्या नावाखाली अघोरी क्रिया केल्याचा बनाव रचत हा प्रकार केल्याचे उघड झाले असून, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Ashok Kharat Case: आणखी धक्कादायक प्रकार समोर येण्याची शक्यता

दरम्यान, यापूर्वीच खरातवर बलात्कार, लैंगिक छळ आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आता हा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायदा’ (अंधश्रद्धा निर्मूलन कायदा) अंतर्गत आणखी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपआयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) करत आहे. खरातच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी सुरू असून, त्यातून अशाच प्रकारचे आणखी धक्कादायक प्रकार समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशोक खरात प्रकरण : NEMK ने घेतली केस?

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला असून, नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खरातवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार, 18 मार्च रोजी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. सुरुवातीला या पेन ड्राइव्हमध्ये 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पुढील तपासात ही संख्या वाढून सुमारे 100 व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे. आता अशोक खरातच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे आल्या आहेत. त्यामुळे खरात विरोधात कारवाई करण्यासाठी एसआयटीला आणखी सबळ पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat: मोठी बातमी: अशोक खरातला झटका, आणखी तीन पीडित महिलांनी भोंदूबाबाच्या कुकर्मचा पाढा वाचला, एसआयटीकडून गोपनीय चौकशी

आणखी वाचा

Comments are closed.