Asian Games 2026 Cricket: जर अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर, कोणाला मिळेल सुवर्णपदक? जाणून घ्या नियम

जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमधील क्रिकेट सामन्यांमा पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. पुरुष संघांचे एक नव्हे, दोन नव्हे चारही उपांत्यपूर्व फेरीचे सामने रद्द झाले आहेत. यामुळे सर्वोच्च आयसीसी मानांकन असलेले भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश एकही सामने न खेळता उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान, नेपाळ, मलेशिया आणि हॉंग कॉंग हे संघ गट फेरी पार करून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले होते, मात्र त्यांना पावसामुळे उपांत्य फेरीत पोहोचला आले नाही.

या स्पर्धेत 28 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध हॉंग कॉंग पहिला उपांत्यपूर्व सामना आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा उपांत्यपूर्व सामना पावसामुळे नाणेफेक न होता रद्द झाले. 29 सप्टेंबरच्या दिवशीही असेच घडले. श्रीलंका विरुद्ध नेपाळ तिसरा उपांत्यपूर्व सामना आणि बांगलादेश विरुद्ध मलेशिया चौथा उपांत्यपूर्व सामना हे पण पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे सुवर्णपदकाच्या लढतीतही पाऊस झाला, तर कोण जिंकेल हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. तर जाणून घेऊ त्याबद्दल.

या स्पर्धेत पुरुष क्रिकेट संघांचे उपांत्य सामने 1 ऑक्टोबर रोजी होतील. तसेच सुवर्ण आणि कांस्य पदकांचे सामने 3 ऑक्टोबर रोजी खेळले जाणार आहेत. हे सामनेही पावसामुळे रद्द झाले तर संघ आयसीसी मानांकनानुसार पुढील फेरीत पोहोचतील. तसेच अंतिम सामनाही पावसामुळे रद्द झाला, तर उच्च मानांकन असलेला संघ विजेता घोषित केला जाईल असा कोणताही नियम नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात खेळणारे दोन्ही संघ सुवर्ण पदकाचे मानकरी ठरतील.

हा नियम 2023 च्या स्पर्धेत नव्हता. तेव्हा भारत आणि अफगाणिस्तान अंतिम सामन्यात भिडले होते. पावसामुळे तो सामना मध्यातच रद्द करण्यात आला होता. त्यावेळी अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 18.2 षटकांत 5 विकेट्स गमावत 112 धावा केल्या होत्या आणि पावसाला सुरूवात झाली होती, मात्र पाऊस न थांबल्याने भारत आयसीसीच्या सर्वोच्च मानांकनाच्या जोरावर सुवर्ण पदक विजेता ठरला होता.

आता या नियमामध्ये बदल झाला असून अंतिम सामन्यात पाऊस आला आणि तो रद्द झाला तर दोन्ही संघांना सुवर्ण पदक मिळेल. यामुळे भारताला आपले सुवर्णपदक कायम राखता येईल.

तसेच नियमांमध्ये झालेल्या बदलानुसार, आता दोन्ही संघाना किमान पाच षटके खेळावे लागतील तरच सामना अधिकृत मानला जाईल, नाहीतर रद्द होईल. पाच षटके खेळल्यानंतर पाऊस आल्यास डकवर्थ-लुईस पद्धत वापरली जाईल. या स्थितीत एकाच संघाला सुवर्णपदक मिळेल.

या स्पर्धेत क्रिकेटचे सर्व सामने निशीनच्या कोरोगी स्पोर्ट्स पार्कवर खेळले जात आहेत. (Asian Games 2026 Cricket: If final match is washed out due to rain, who will win gold medal? Know the rules.)

Comments are closed.