INDvsWI: “विराट लंडनमध्ये राहो किंवा अमेरिकेत, काही फरक पडत…”, किंग कोहलीच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूची रिऍक्शन

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने रविवारी (27 सप्टेंबर) पुन्हा एकदा आपल्या उत्तम कौशल्याचा नमुना सादर केला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या धमाकेदार खेळीनंतर सर्वजण त्याचे कौतुक करत असून भारताच्या माजी क्रिकेटपटूने केलेल्या वक्तव्याने लक्ष वेधले आहे.

तिरुअनंतपुरमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला वेस्ट इंडिजने 296 धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. तेव्हा विराटने 88 चेंडूंत 10 चौकार आणि 9 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 139 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीचे विशेष कौतुक मोहम्मद कैफने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील एका कार्यक्रमात केले.

विराट आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये राहत असल्यामुळे अनेकांनी मायदेशापासून दूर राहण्याबद्दल त्याच्यावर टीका केली आहे. त्यावरून कैफ म्हणाले, “जर कोहली अशा खेळी खेळू शकत असेल, तर तो लंडनमध्ये राहो किंवा अमेरिकेत, त्याने काही फरक पडत नाही. त्याला जिथे राहायचे असेल तिथे तो राहू शकतो.

“विराट बाहेर राहत असल्याबद्दलही अनेकांनी आक्षेप घेतला होता. कारण काहीही असो, त्याचा त्याच्या खेळावर अजिबात परिणाम झालेला नाही. त्याने सगळ्यांची तोंडे बंद केली आहेत. बाहेर राहून तो धावा कशा करणार, असा प्रश्न सगळ्यांनी विचारला होता, पण त्याने या सगळ्याला पूर्णविराम दिला आहे. तो 2023 च्या विश्वचषकात ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’, 2024 च्या टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात ‘सामनावीर’ होता, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावले आणि आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यातही तो ‘सामनावीर’ ठरला होता,” असे कैफने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

कैफ यांनी विराटच्या बदलत्या स्वभावाबद्दल म्हटले, “तो आपल्या टीकाकारांना बॅटने किंवा शब्दांनी उत्तर देत असे. आता त्याचे लक्ष केवळ मैदानावर धावा करणे आणि संघाला विजय मिळवून देणे याच्यावर आहे.”

तसेच कैफने पुढे हे पण स्पष्ट केले की, विराट आणि सचिन तेंडुलकर हे जगातील दोन असे क्रिकेटपटू जे कधीही अहंकारी नव्हते.

विराटने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 55 वे शतक झळकावल्यानंतर अनेक विक्रम मोडले. (“Whether Virat lives in London or America, it makes no difference…” Mohammad Kaif reaction after Kohli’s century vs WI 1st ODI)

Comments are closed.