RSS कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला

झारखंडमधील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडमधील रांचीच्या निवारणपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यालयावर मंगळवारी रात्री उशिरा पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. दोन हल्लेखोरांनी आरएसएस कार्यालयाला लक्ष्य करून दोन पेट्रोल बॉम्बने नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॉम्ब कार्यालयाच्या आवारात पोहोचू शकले नाहीत. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून, रांची पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेसंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरएसएस कार्यालयावर मध्यरात्री 12:36 वाजता दोन तरुणांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. यातून एका मोठ्या कटाचा उलगडा होतो. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांशीही संपर्क साधला आहे. आम्ही आरएसएस कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त लावण्याची विनंती केली आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते संजय सेठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Comments are closed.