अशोक खरात प्रकरणी मराठी अभिनेत्याकडून प्रश्नांची सरबत्ती, पोस्ट करत काय म्हणाला…
अशोक खरात प्रकरणावर अतुल कुलकर्णी : महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) या भोंदूबाबाचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. पोलिसांकडे तक्रार करणारी महिला एकमेव नाही तर अशा अनेक महिलांचं त्यानं शोषण केल्याचं समोर येतंय. अशोक खरातच्या अत्याचाराचे 58 व्हिडीओ आतापर्यंत पोलिसांना सापडले आहेत. विकृत भोंदुबाबा अशोक खरातचे प्रताप समोर आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात (Maharashtra News) खळबळ माजली आहे. सर्वच स्तरांतून या प्रकरणी संताप व्यक्त केला जातोय. अशातच आता मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे अशोक खरातवर भाष्य केलं आहे.
महिलांच्या भावनांशी खेळत, अंधश्रद्धेचा फायदा घेऊन अशोक खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. यावरच मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी (Marathi Actor Atul Kulkarni) यांनी संताप व्यक्त केला आहे. अतुल कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ते आपलं मत व्यक्त करत असतात. कधी परखडपणे थेट, तर कधी कवितेच्या माध्यमातून अतुल कुलकर्णी व्यक्त होत असतात. अशातच आता अख्खं राजकारण ढवळून काढणाऱ्या अशोक खरात प्रकरणी त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. जर हे लोक पकडले गेले तरच भोंदू ठरतात, मग त्या आधी ते कोण असतात? असा सवाल अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
अतुल कुलकर्णी नेमकं काय म्हणाले? (Atul Kulkarni Social Media Post On Ashok Kharat)
अतुल कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकं काय म्हणाले अतुल कुलकर्णी सविस्तर पाहुयात…
पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’? त्या आधी ते काय असतात ? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते?
ज्या वेळी कुणी ‘महाराज’ भोंदू ‘निघतात, तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात-भागीदार, पिडीत, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?
श्रद्धा, अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय ? डोळस आणि अंध श्रद्धां मधे अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं ? करणारे की होणारे? अंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते ?
हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)?
लैंगिक अत्याचारासोबतच अशोक खरात यांचे आर्थिक फसवणुकीचे जाळे (अशोक खरात प्रकरण)
नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. धार्मिक विधी, अंधश्रद्धा आणि भीती यांचा आधार घेत खरातने केवळ महिलांचे शोषणच नाही, तर आर्थिक फसवणुकीचंही मोठं जाळं उभं केलं होतं, अशी माहिती तपासातून उघड झाली आहे.
कॅप्टन अशोक खरातप्रकरणी एसआयटी चौकशीला वेग आलाय. डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात झालीये. फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू झालंय. आर्थिक व्यवहार, खरातचं नेटवर्क तसंच सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. अशोक खरातनं पाथर्डी गवळाणं, सिन्नर आणि शिर्डी, ओझर परिसरात कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांकडू तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.