आमची सत्ता येईल, तेंव्हा सर्वांची चौकशी लाऊन आत टाकू; अविनाश जाधवांचा इशारा, शिवसेना-मनसे एकत्र
ठाणे : राज्यात पुढील काही दिवसांत महापालिका (Thane) निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतून मनसेचे (MNS) नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर टीका केली. ठाणे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भूमिका जाहीर करत लवकरच वाहतूक कोंडीविरुद्ध मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. तसेच, या पत्रकार परिषदेत आम्ही दोन पक्ष असलो तरी जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण हेही दिसतील. आम्ही बाळासाहेबांची मूळ फौज आहोत, आता पैसा टिकणार नाही, असे म्हणत अविनाश जाधव (अविनाश जाधव) यांनी शिवसेना शिंदे गटाला इशाराच दिला आहे.
ठाण्यात दहशतीचे वातावरण असून दहशतीला घाबरून अनेकजण तिकडे आहेत, आम्ही एकत्रपणे लढू, आम्ही घाबरणार नाही, ठाणेकरांसाठी आम्ही लढणार, असे म्हणत अविनाश जाधव यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे युतीचे संकेत दिले आहेत. 4 हजार कोटींच्या मोठेपालिकेला या लोकांनी बरबाद केले, या लोकांनी पालिका लुटून खाल्ली. ज्यावेळी आमची सत्ता येईल, तेंव्हा सर्वांची चौकशी लाऊन यांनाही एएटी टाकू, असा इशाराच जाधव यांनी दिली.
घोडबंदआणिला काही अधिकारी पाणी विकतात, ठाण्यात वाहतूक कोंडीला कंटाळून लोक रस्त्यावर उतरले. आता, गडकरी रंगायतन ते ठाणे पालिका असा मोर्चा निघेएल, यापुढे असे अनेक मोर्चे निघतील, ठाणेकरांसाठी असे अनेक मोर्चे काढले जातील, असेही जाधव यांनी म्हटले. तर, आजच्या दाबा कॉन्फ्रन्समध्ये आम्ही दोन पक्ष असले तरी आम्ही आहोत आमदार जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण हेही दिसतील, असे म्हणत महाविकास आाडीत एकत्र असल्याचेही संकेत जाधव यांनी दिले आहेत. आमची बाळासाहेबांची मूळ फौज आहे, इथे पैसा टिकणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
महापालिकेत मोठा भ्रष्टाचार
शिवसेना माजीआमदार राजन विचारे यांनीही आपली भूमिका मांडताना सत्ताधारी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ठाणे पालिकेची अवस्था काय केली तुम्हाला माहिती आहे. 2017 ते 2025 या कालावधीत एकही निवडणूक घेतली नाही. निवडणूक घेण्यासाठी का घाबरता? पालिकेची अवस्था तुम्हाला माहीत आहे काय सुरू आहे, 30 ते 35 कोटी देखील महापालिकेकडे नाहीत. पालिका लुटून झाल्यानंतर शासनाचे पैसे देखील आणले, परंतु त्याचा लेजर नाही. सर्व कामे कागदावर आहेत. वर्धापाण्याचा दिवस खुशखबर दिली, अधिकाऱ्याला टिकवून ठेवले पकडले, असे म्हणत विचारे यांनी ठाणे महापालिकेचा भ्रष्टाचार पत्रकार परिषदेतून मांडला.
ठाण्यात सोमवारी धडक मोर्चा
मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत, अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असताना जाहिरात दिले जाते. भ्रष्टाचारात ठाणे क्रमांक वन आहे. भाजी आणणाऱ्या पी.ए.ला अंगरक्षक दिले आहेत. आता, रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. स्वतःचे धरण नाही, अविनाश जाधव यांनी पाण्याच्या टँकरची लॉबी कशी काम करते ते सांगितले? एमएमआरडीए असेल यासारख्या संस्था कडून आणलेला निधी गेला कुठे? असा सवाल देखील राजन विचारेंनी विचारला. आम्ही सोमवारी धडक मोर्चा आणत आहोत, सर्वानी या मोर्चात सामील व्हावं, प्रशासनाला जाब विचाराण्यांसाठी जात आहोत, रस्त्यावर उतरून यशस्वी आंदोलन करणार, असा इशाराही विचारे यांनी दिला.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.