काँग्रेसकडून शरद पवारांना मोठा हादरा, परभणीतील मातब्बर नेता गळाला लावला, पक्ष प्रवेशाची तारीखही

बाबाजानी दुरानी: लोकसभेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठं यश मिळालं होतं तर महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का बसला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने महाविकास आघाडीला मोठा हादरा दिला होता. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते महायुतीतील घटक पक्षात सहभागी होत आहेत. मात्र, परभणीत महाविकास आघाडीतील काँग्रेसनेच (Congress) राष्ट्रवादी शरद पवार गटाला (NCP Sharad Pawar Faction) मोठा धक्का दिलाय. परभणीतील शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) काँग्रेसच्या वाटेवर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अखेर आपली राजकीय दिशा स्पष्ट करत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

सत्ताधारी गटात न जाता थेट काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असलेले दुर्राणी अलीकडे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांनी कोणत्याही सत्ताधारी गटात न जाता थेट काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. सध्या काँग्रेसमधून अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते बाहेर पडत असतानाच बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणं, पक्षासाठी दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी 7 ऑगस्टला मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. त्यामुळे परभणीत शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत बाबाजानी दुर्राणी?

बाबाजानी दुर्राणी हे परभणीतील मोठे नेते आहेत. 2004 मध्ये ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. 2012 आणि 2018 असे सलग दोनदा शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दुर्रानी अजित पवारांसोबत गेले होते. मात्र तिथे त्यांच्या हाती काही लागले नाही आणि ते पुन्हा शरद पवारांसोबत गेले. आता शरद पवारांची साथ सोडून ते काँग्रेसच्या वाटेवर आहे. परभणी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी त्यांच्यामुळे भरून निघण्याची शक्यता आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Kabutar Khana: आमच्यावर 100 टक्के टॅक्स लावा, आम्ही भरण्यास तयार; कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक

आणखी वाचा

Comments are closed.