आमदारकीसाठी पक्ष विलीन करायला मी मूर्ख नाही! अफवा पसरवणाऱ्यांना बच्चू कडूंचा प्रहार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विधान परिषदेची आमदारकी मिळावी म्हणून बच्चू कडू त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष एकनाथ शिंदे गटात विलीन करणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. आज स्वतः बच्चू कडू यांनीच त्या चर्चेला पूर्णविराम दिला. ‘एका आमदारकीसाठी प्रहार पक्ष विलीन करायला बच्चू कडू एवढा मूर्ख नाही,’ असे ते म्हणाले.

विलीनीकरणाचा कोणताही अधिपृत प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी पह्नवर ओझरती चर्चा झाली होती, पण त्यात कोणतीही स्पष्टता नव्हती, असे सांगत त्यांनी सध्या सुरू असलेल्या वावडय़ा फेटाळून लावल्या. फॉर्म भरण्यासाठी अजून कोणताही पह्न आलेला नाही; कागदपत्रे नेहमी माझ्या बॅगेतच असतात, पण याचा अर्थ असा नाही की मी स्वाभिमान गहाण ठेवला आहे, असे कडू म्हणाले.

Comments are closed.