अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..


बुलढाणा बातम्या : बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद (Buldhana Shetkari Hakk Parishad) पार पडली. या परिषदेत माजी आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) , राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar), ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार (Deepak Kedar) उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्याला आपण जर विचारलं की तुला काय येतं तर त्याला काहीच येत नाही असं सांगतात. मग आत्महत्या का करतो? अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक, अशा तीव्र शब्दात संताप व्यक्त करत bच्चू कडू यांनी सरकारवर दाबा केला आहे. या परिषदेत दीपक केदार यांनीही सरकारवर शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरवत संताप व्यक्त केला.

Farmer Protest : …..तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात

ही वेदनाची परिषद, दुःखाची परिषद आहे. दिवाळीच्या दिवशी ही घ्यावी लागत आहे. तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात. मोर्चे, मेळावे, प्रचाराला गर्दी असते, मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते. बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी तुमच्यासाठी काही कमी केलं का? अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले. या सरकारने शेतकऱ्यांना भगवा हिरवा निळा रंगात वाटलं आणि त्यामुळे शेतकरी वाटल्या गेला. शरद जोशींना शेतकऱ्यांनी पाडलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पाडलं, मलाही शेतकऱ्यांनीच पडलं. कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असंच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही. असे हि bच्चू कडू यावेळी म्हणाले.

Bacchu Kadu : तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते

लोकसभेची निवडणूक असताना तुम्ही कापसाला भाव मागितला का? सोयाबीनला भाव मागितला का? तुम्ही जात पाहिली. पण सर्व जाती याच मातीमुळे जगतात हे विसरू नका. शेतकरी हे सगळ्या जातीत सापडतात. सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्याला हे लुटतात. सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं.तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते. शेतकऱ्याला आपण जर विचारलं तर तू काय करतो तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. हा कार्यक्रम जर सुरू केला तर गुढग्यावर येईल सरकार. पण हा कार्यक्रम कोणाला द्यायचा. मरण्यापेक्षा लढणे सुरू करा. आमच्या मालाला भाव मिळाला तर आम्ही लोकांना नोकरीला ठेवू. आरक्षणामुळे एखादी परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो, मात्र मालाला भाव मिळाला तर अख्खा गाव सुखी होऊ शकेल. असेही bच्चू कडू यावेळी म्हणाले.

….अन् आम्ही बायकोची आठवण आली की चाललो घरी

शेतकऱ्यांना जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाही नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल. मोदींनी शंभर लाख गाठी कापसाच्या अमेरिकेतून मागितल्या आहे. कुठे मीडियात बातमी आहे का? या मीडियावाल्यांचे अर्धे मालक भाजपचे आहे. जोपर्यंत मातीची किंमत होत नाही तोपर्यंत जग सुधरत नाही. गाव आणि शेतकरी गरीब राहिला तरच शहर श्रीमंत होतील, अस यांचे हे तत्व आहे. 28 तारखेला आपण नागपूरला जाणार. पंजाबच्या शेतकऱ्यांनी 13 महिने आंदोलन करून काळे कायदे रद्द करायला लावले आणि आम्ही बायकोची आठवण आली की चाललो घरी. जेवढी शेतात मेहनत करता त्याच्या एक टक्के आंदोलनात मेहनत करा आणि तुमचं काम होईल. जेव्हा सगळ्या रंगाचे झेंडे घेऊन शेतकरी लढेल त्यावेळेस सुखाचे दिवस येतील. असा विश्वास यावेळी बोलताना bच्चू कडू यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.