धक्कादायक! बेकरीतील केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी बदलापुरात दाखल
बदलापूर क्राईम न्यूज: बदलापुरात एका नामांकित बेकरी मधून खरेदी केलेल्या केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा किळसपणा प्रकार समोर आला होता. या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने या बेकरीची पाहणी करत कारवाईला सुरुवात केली आहे. तर याच बेकरीत ठेवलेल्या खारीच्या ट्रेमध्ये देखील उंदराचा वावर आढळून आला होता.
बदलापुरातील नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांनी बेलवली इथल्या बेकरीतून रवा केक खरेदी केला होता. हा केक खाताना हर्षाली गायकवाड यांना त्यात उंदराची विष्ठा असल्याचं आढळून आलं. त्यानंतर उलट्या आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी थेट सदरील बेकरी चालकाला जाब विचारला. बेकरी चालकाने सावरा सावर करत उंदराची विष्ठा नसून चोकोचिप असल्याचं सांगितलं. परंतु याची तक्रार करून हा केक टेस्टिंगसाठी पाठवते असं म्हणताच बेकरी चालकाने आपली चूक कबूल केली.
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेकरी चालकांवर कारवाईची मागणी
घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाला मिळताच त्यांनी सदरील बेकरीला भेट देत कारवाईला सुरुवात केली आहे. तर नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेकरी चालकांवर कारवाईची मागणी केली जाते. दरम्यान आता अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत नेमकं काय आढळून येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.