छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल बागेश्वर बाबांनी मागितली माफी
छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते त्यामुळे त्यांनी समर्थ रामदासांकडे जाऊन आपण राज्य कारभार सांभाळावा अशी प्रार्थना केली होती, असे वक्तव्य बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्व स्तरातून टीका होऊ लागल्याने आता बागेश्वर बाबांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे.
Comments are closed.