सीमांकन विधेयक प्रकरणात आझम खान यांना जामीन?
भाजप आणि सपमध्ये तडजोड झाल्याचा एआयएमआयएमचा आरोप
लखनौ : परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशातील राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने भाजपसोबत समझोता केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आझम खान यांच्या जामिनाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.एआयएमआयएमचे पूर्वांचल अध्यक्ष इसरार अहमद यांनी आझम खान यांच्या तुऊंगातून सुटकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आझम खान यांना तुऊंगाबाहेर आणण्यात आले असून, यामागे समाजवादी पक्ष आणि भाजप यांच्यात समझोता झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चित्र स्पष्ट होणार?
इसरार अहमद यांनी दावा केला की, संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक मांडले जाईल, तेव्हा आझम खान यांच्या सुटकेमागील कथित हेतू स्पष्ट होईल. समाजवादी पक्ष या विधेयकाच्या विरोधात सभात्याग करेल; मात्र विधेयक मंजूर झाल्यानंतर आझम खान यांना पुन्हा तुऊंगात जावे लागू शकते, असेही त्यांनी म्हटले.
अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा
एआयएमआयएम नेत्याने अखिलेश यादव यांच्यावरही गंभीर आरोप केले. अखिलेश यादव यांनी कुठे आणि कोणासोबत राजकीय सौदा केला आहे, हे सर्वांना माहीत असल्याचा दावा त्यांनी केला. आझम खान यांना अखिलेश यादव यांच्यासोबत केलेल्या कथित कृत्यांची शिक्षा भोगावी लागत असल्याचेही इसरार अहमद म्हणाले. या प्रकरणाचा परिणाम त्यांच्या कुटुंबालाही सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Comments are closed.