मुंबईत रंगले ‘घरगुती व्यंगचित्रकार’ संमेलन
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुंबईत पहिल्यांदाच ‘घरगुती व्यंगचित्रकार’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी आयोजित केलेले हे संमेलन उद्योगपती महेश मुद्दा यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडले. या निमित्ताने मुंबईतील व्यंगचित्रकारांनी एकत्र येऊन बाळासाहेबांच्या काही रंजक आठवणींना उजाळा दिला.
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांनी बाळासाहेबांच्या काही रंजक आठवणी सांगत कार्यक्रमाला सुरुवात केली. मुळय़े काकांनीदेखील अनेक किस्से सांगून गप्पांची मैफल रंगवली. या कार्यक्रमाला माजी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि त्यांच्या पत्नी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार नीलेश जाधव यांनी रेखाटलेले अशोक मुळय़े यांचे अर्कचित्र तसेच सुरेश लोटलीकर आणि विजय परुळेकर यांनी स्वहस्ते रेखाटलेली बाळासाहेबांची काही पेंटिंग्ज मुळ्येय़े काकांना भेट देण्यात आली. या घरगुती संमेलनाला संजय मिस्त्राr, देव खरे, प्रभाकर वाईरकर, सुरेश लोटलीकर, विजय परुळेकर, रवीश धनावडे, गौरव सर्जेराव, विवेक मेहेत्रे, श्रीनिवास प्रभुदेसाई, रवींद्र राणे, नीलेश जाधव, ओंकार बागवे आणि उदय मोहिते आदी व्यंगचित्रकार उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध गायिका विद्या करलगीकर यांनी सादर केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Comments are closed.