पाकिस्तानमध्ये मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर बंदी, नवीन गाडी खरेदी करता येणार नाही, लग्नात फक्त एकच डीश ठेवण्याचे फर्मान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण-इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्ध संपले नसल्याने याचा थेट फटका पाकिस्तानला बसला आहे. पाकिस्तान सरकारने देशात थेट कोरोना काळातील लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध आणि कठोर काटकसरीचे धोरण लागू केले आहे. नवीन गाड्यांच्या खरेदीवर पूर्ण बंदी, मंत्र्यांच्या परदेशवारीवर लगाम आणि लग्नसमारंभात पाहुण्यांसाठी फक्त ‘एकच पदार्थ’ वाढण्याचे फर्मान सरकारने सोडले आहे. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळ सचिवालयाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली असून हे नियम तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत.

सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, बाजारपेठा आणि ग्रॉसरी स्टोअर्स रात्री 9 वाजेपर्यंत बंद करावी लागतील. लग्नकार्याचे हॉल आणि इतर मंगल कार्यालये रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. हॉटेल्स, कॅफे आणि खानावळी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. पार्सल आणि होम-डिलिव्हरी सेवांना यातून सूट आहे. औषधांची दुकाने, रुग्णालये, पेट्रोल-सीएनजी पंप, ई-व्ही चार्जिंग स्टेशन आणि आयटी/कॉल सेंटर्स या निर्बंधातून वगळण्यात आले आहेत.

ऑनलाइन बैठका घ्या

सरकारी विभागांना शहराबाहेरील बैठकांऐवजी दूरध्वनीद्वारे किंवा व्हर्च्युअल कॉन्फरन्स घेण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही सरकारी सेमिनार किंवा वर्कशॉप खासगी हॉटेल्समध्ये आयोजित न करता केवळ सरकारी सभागृहातच घ्यावा लागेल. पाकिस्तानकडे परकीय चलनाची कमतरता असल्याने इंधनाची आयात कमी करणे आणि सरकारी तिजोरीवरील ताण कमी करणे हाच या कडक निर्बंधांमागील मुख्य उद्देश आहे.

Comments are closed.