'लॉरेन्स ऑफ पंजाब' वेब सिरीजवर बंदी

केंद्र सरकारची कारवाई : उच्च न्यायालयाकडून याचिका निकाली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, लुधियाना

केंद्र सरकारने गँगस्टर लॉरेन्सच्या जीवन आणि घटनांवर आधारित ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ या वेब सीरिजवर बंदी घातली आहे. पंजाब पोलिसांनी केंद्र सरकारला पत्र लिहून या परिस्थितीमुळे राज्यातील वातावरण बिघडेल अशी चिंता व्यक्त केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली.

‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ या माहितीपटाला विरोध होत असल्यामुळे त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. ही वेब सीरिज 27 एप्रिल रोजी जी-5 वर प्रदर्शित होणार होती. मात्र, आता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जी-5 ला ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ प्रसारित न करण्याचे आदेश दिले. केंद्र सरकारने ही माहिती दिल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली. राजा वॉरिंग यांनी या माहितीपट मालिकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळली आहे.

केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर, जी-5 ला ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’चे प्रसारण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही माहिती पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला देण्यात आली. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने खंडपीठाला माहिती दिली की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जी-5 ला ही मालिका प्रसारित न करण्याचे निर्देश आधीच दिले होते. ही बाब लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष आणि लुधियानाचे खासदार अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली.

Comments are closed.