वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी परवानगी देताच कशी? ठाकरेंच्या सेनेकडून व्हिडीओ शेअर; राज्य स
वांद्रे फोर्ट अल्कोहोल पार्टी: महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या आणि संरक्षित हेरिटेज स्थळांमध्ये गणल्या जाणाऱ्या वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टी (Bandra Fort Alcohol Party) केल्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाने समोर आणला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी महाराष्ट्र सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच मुंबई महानगरपालिकेवर थेट निशाणा साधत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तर राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून सुरुवात करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती असल्याची घणाघात देखील त्यांनी केलाय.
अखिल चित्रे यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेला, नंतर ब्रिटिश तसेच मराठा इतिहासाची साक्ष देणारा बांद्रा किल्ला या हेरिटेज स्थळी दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्पादन शुल्क विभाग आणि BMC परवानगी देतातच कसे? आणि किल्ल्यावरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग? असा सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
Bandra Fort Alcohol Party: स्थानिक आमदार आणि संस्कृती मंत्री कुठे आहेत?
अखिल चित्रे यांनी पुढे म्हटले आहे की, नक्की काय सुरु आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी? असे म्हणत त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यावर टीका केलीय. तर राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून सुरुवात करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती असल्याची घणाघात देखील त्यांनी केलाय.
महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि @mybmc @mybmcWardHW… pic.twitter.com/pV1Urn0C6b
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) 16 नोव्हेंबर 2025
Bandra Fort Alcohol Party: घटनेचा व्हिडिओ स्थानिकांनी शूट केल्याचा दावा
दरम्यान ही घटना 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची असून स्थानिक रहिवाशांनीच व्हिडिओ शूट केल्याची माहिती अखिल चित्रे यांनी दिली आहे. या प्रकरणावर इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आता राज्य सरकार यावर काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.