गंगा पाणी वाटप करारावर बांगलादेशची मवाळ भूमिका!
नव्या कराराची मागणी सोडली : भारतासोबत चर्चेतून निघणार तोडगा?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील गंगा जलवाटप करारावरून सुरू असलेल्या चर्चेला आता सकारात्मक वळण मिळण्याची शक्मयता आहे. बांगलादेशातील तारिक रहमान सरकारने या मुद्द्यावर काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत. आतापर्यंत नव्या कराराची मागणी करणाऱ्या बांगलादेशने आता भारतासोबत 1996 मध्ये झालेल्या गंगा जलवाटप कराराच्या नूतनीकरणासाठी औपचारिक चर्चा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. डिसेंबर 2026 मध्ये या कराराची मुदत संपत असल्याने दोन्ही देशांकडून त्याच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत.
वृत्तसंस्था, ढाका
भारत आणि बांगलादेशमधील अधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संयुक्त नदी आयोगाचे प्रमुख शरद चंद्र करत आहेत, तर बांगलादेशच्या सहा सदस्यीय पथकाचे नेतृत्व अन्वर कादिर यांच्याकडे आहे.
भारताच्या मते, गंगा जलवाटप करारासह सीमापार नद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त नदी आयोग हीच अधिकृत यंत्रणा आहे. दुसरीकडे, बांगलादेशला उन्हाळ्यात आणि पाण्याची कमतरता असलेल्या काळात पुरेसे पाणी मिळण्याची हमी हवी आहे. यासाठी भारताने स्वतंत्र तांत्रिक समिती स्थापन करावी, अशी मागणीही ढाक्मयाकडून करण्यात आली होती.
दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा
गंगा जलवाटप करारासंदर्भात बांगलादेशच्या 10 सदस्यीय तांत्रिक समितीचे प्रमुख आणि पंतप्रधानांचे सल्लागार राशद तितुमीर यांनी रविवारी महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले की, करारासंदर्भातील आवश्यक तयारी बांगलादेशने पूर्ण केली आहे. आंतरराष्ट्रीय नदी असलेल्या गंगेच्या पाण्याचे समान आणि न्याय्य वाटप सुनिश्चित करण्यासाठी भारत प्रभावी पावले उचलेल, अशी अपेक्षा आहे. ढाका येथे भारत-बांगलादेश संयुक्त समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर तितुमीर यांनी कराराची सध्याची मुदत संपण्यापूर्वी भारताने पुढाकार घ्यावा, जेणेकरून औपचारिक चर्चेचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही देशांनी कराराच्या अंमलबजावणीसंदर्भातील वार्षिक अहवालालाही अंतिम स्वरूप दिले आहे.
अंतिम निर्णय दोन्ही देशांचे राजकीय नेतृत्व घेणार
गंगा जलवाटप कराराचे नूतनीकरण करायचे की त्याला अंतरिम मुदतवाढ द्यायची, तसेच त्यातील अटी काय असतील, याचा अंतिम निर्णय दोन्ही देशांचे राजकीय नेतृत्व घेणार आहे. बांगलादेशचे जलसंपदा मंत्री शाहिदउद्दीन चौधरी यांनी अलीकडेच राजनैतिक माध्यमांतून भारताच्या संबंधित मंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रातून करारासंदर्भातील चर्चा लवकर सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशने जून 2026 मध्ये उच्चस्तरीय तांत्रिक समिती स्थापन केली होती. याबाबत भारतालाही माहिती देण्यात आली आहे. तसेच भारतानेही स्वत:ची तांत्रिक समिती स्थापन करून त्याबाबत ढाक्मयाला कळवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
गंगा जलवाटप करार नेमका काय आहे?
भारत आणि बांगलादेश हे शेजारी देश असून दोन्ही देशांमध्ये एकूण 54 नद्या सामायिक आहेत. या नद्या दोन्ही देशांतून वाहतात. मात्र, गंगा नदीच्या पाणीवाटपाबाबतच दोन्ही देशांमध्ये स्वतंत्र द्विपक्षीय करार आहे. गंगा नदीच्या पाणीवाटपाचा मुद्दा 1980 च्या दशकाच्या सुऊवातीपासून चर्चेत होता. अखेर 12 डिसेंबर 1996 रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात गंगा जलवाटप करार झाला. तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
या करारानुसार जानेवारी ते मे या कालावधीत गंगेच्या पाण्याच्या प्रवाहानुसार दोन्ही देशांमध्ये पाणीवाटप केले जाते.
?नदीचा प्रवाह 70 हजार क्मयुसेकपेक्षा कमी असल्यास दोन्ही देशांना ठरलेल्या तरतुदींनुसार पाणी मिळते.
?प्रवाह 70 हजार ते 75 हजार क्मयुसेक दरम्यान असल्यास बांगलादेशला 35 हजार क्मयुसेक पाणी देण्याची तरतूद आहे.
??पाण्याच्या उपलब्धतेनुसार दोन्ही देशांमधील वाटपाचे प्रमाण निश्चित केले जाते.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या काही काळात निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा परिणाम या कराराच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेवरही झाला आहे. त्यामुळे आता दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढणार का, याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.
Comments are closed.