बँका या आठवड्यात सलग चार दिवस बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी


बँक हॉलिडे मुंबई: बँकांना नोव्हेंबर महिन्यात एकूण 11 दिवस सु्ट्टी आहे. त्यापैकी चार सुट्ट्या या आठवड्यात आहेत. बँका 3 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत सलग चार दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार सण आणि साप्ताहिक सुट्टी मिळून देशातील चार बँका सुट्टीनिमित्त बंद असतील.

साधारणपणे बँका स्थानिक आणि प्रादेशिक सणांनिमित्त बंद असतात. वेगवेगळ्या राज्यात बँका वेगळ्या दिवशी बंद असू शकतात. साप्ताहिक सुट्टी रविवारी असते. याशिवाय बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात.

बँकांना सलग चार दिवस सुट्टी

5 नोव्हेंबर : गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि रहस पौर्णिमेनिमित्त आयजोल, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, ईटानगर, जयपूर, जम्मू, कानपूर, कोहिमा, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्लीरायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

6 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पाटणा येथे बँक बंद असतील. शिलाँमध्ये नोंगक्रेम नृत्याच्या निमित्तानं बँकांना सुट्टी असेल.हा सण पाच दिवस साजरा केल जातो. यामध्ये पुरुष आणि महिला पारंपरिक नृत्य करतात.

7 नोव्हेंबर : वांगला उत्सवाच्या निमित्तानं शिलाँगमध्ये बँका बंद राहतील. या दिवशी आदिवासी लोक सालजोंग किंवा सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली जाते.

8 नोव्हेंबर : बंगळुरुमध्ये कनकदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.  या शिवाय हा महिन्यतील दुसरा शनिवार असल्यानं देखील बँका बंद राहतील.

9 नोव्हेंबर : रविवारी साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँका बंद राहतील.

ऑनलाईन सेवा सुरु राहणार

बँकांचं प्रत्यक्ष कामकाज विविध सणांच्या निमित्तानं बंद असलं तरी ऑनलाईन सेवा सुरु असणार आहेत. नेट बँकिंगद्वारे व्यवहार करता येतील. एटीएम, यूपीआय, नेट बँकिंग यासारख्या सुविधा सुरु असणार आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.